कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी lyrics
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी झाड फुलांनी आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडुन वर्षाकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषारा काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुन मोती हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी देव बोलतो बाळमुखातुन, देव डोलतो उंच पिकांतुन कधी होउनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी