रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, पालक खा
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पालक भाजी खा
डॉ सौ अनघा कुलकर्णी
पालक स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्यात
धुऊन घ्या,
बारीक चिरा,लसूण पाकळ्या 4 सोलून
चिरून घ्या,
तेल गरम करून त्यात मोहरीचे दाणे टाका,
दाणे तडतडू द्या, गॅस बारीक ठेवा त्यात हळद, हिंग, तिखट टाका व लसूण टाका,
शेंगदाणे टाका,आता त्यात चिरलेला
पालक टाकून मंद गॅसवर परता,मीठ व गुळ चवीनुसार टाका
आवडीप्रमाणे डाळीचे पीठ व पाणी टाका
मंद गॅसवर थोडे शिजून
झाकण ठेवा . भात, चपाती, ब्रेड, सँडविच,
पास्ता, पिझ्झा सोबत खा
@dr anagha kulkarni
#happyandhealthylifeathome
#healthnovel
Comments
Post a Comment