पालखी सोहळ्याची वाटचाल,आळंदी ते पंढरपूर वारी
पालखी सोहळ्याची वाटचाल आळंदी ते पंढरपूर वारी पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत. १. आळंदी -पालखी आळंदीतून निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. २. पुणे - पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.) ३. दिवेघाट - नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांगयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते. ४. सासवड -* वड म्हणजे सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपानदेवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे. ५. जेजुरी - नंतर पालखी जेजुरीला येते. ज = जिते...