Posts

Showing posts with the label आषाढी वारी

आषाढी वारी, स्वरा भजनी मंडळ, वारी भजन, भजन lyrics

पांडुरंगाच्या वारीला पालखी सजली पालखी सजली , माऊली रथात निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र आळंदी हुन झाले माऊलीचे आगमन मुखी विठुचा गजर सारी वैष्णव आनंदली।।1।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र देहू हुन झाले तुकोबा चे आगमन ज्ञानोबा तुकाराम भजनाने सारी पंढरी दुमदुमली।।2।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र हुन नाशिक हुन माऊली गुरू निवृत्ती नाथ पंढरीच्या दर्शनाला नाथ पंथी निघाले।।3।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण मुक्ताई पालखी आली लांब गावाहून चांगदेव  शिष्य झाला गुरू भगिनी माऊली।।4।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र हुन सासवड हुन माऊली बंधू सोपान धन्य धन्य ही पंढरी ब्रह्मनंदी टाळी झाली।।5।। स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी

आषाढी वारी|पंढरपूर|वारकरी |आषाढी एकादशी| पंढरपूर पदयात्रा

आषाढी वारी(पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.  वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये सर्व जाति-धर्माचे भाविक भक्त जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो ज्ञानेश्वर,तुकाराम,नामदेव इत्यादी संत पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्या सहकाऱ्यांसह निघत असत. त्यांच्या हाती ध्वज, पताका इत्यादी असायचे. या मिरवणुकीस दिंडी असे म्हणण्यात येत असे. कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे.आता ही दिंडी वारकऱ्यांची निघते. ते आपसात वाटेत येणाऱ्या खर्चासाठी एक ठरावीक रक्कम गोळा करतात व आपल्या गावातून पंढरीस पायी जाण्यास निघतात. या वारीचा उद्देश आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचून विठ्ठलाचे दर्शन घेणे हा असतो.त्यातील बहुतेकांच्या खांद्यावर पताका/ध्वज असतो. कपाळास टिळा, गळ्यात तुळशीची माळ व मुखाने हरिनाम म्हणत वारीतील वारकरी दिंडी सामील होतो. यात सर्वात आधी संत तुकारामाची पालखी देहू या पुण्याजवळच्या गावातुन निघते.तो दिवस ...

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर