आयुष मंत्रालयाने सांगितलेला आयुर्वेदिक काढा
आयुष मंत्रालयाने सांगितलेला आयुर्वेदिक काढा
डॉ सौ अनघा कुलकर्णी
डॉ एकनाथ कुलकर्णी
डॉ दीपक राजपुरोहित
23 मे 2020
सुंठ म्हणजे वाळलेले आले
कफ, वायूच्या सर्व विकारात तसेच हृदय विकाराच्या रुग्णांसाठी सुंठ उपयोगी आहे.
सुंठ पाचक, रोचक, किंचित चवीला तिखट असून लघु, स्निग्ध, उष्ण आहे.
पचल्यावर तिचा मधुर रस होतो
औषधी उपयोग
खालील लक्षणात सुंठ उपयुक्त आहे
पचनाच्या तक्रारी--
भूक न लागणे,अग्निमांद्य, अजीर्ण, उलटी, मळमळ, पोट जड होणे, जेवणा नंतर पोटात दुखणे, आम्लपित्त,आव पडणे, पोट दुखून संडासला होणे,कृमी, पोटदुखी, मूळव्याध,
श्वसनाच्या तक्रारी
सर्दी, खोकला, दमा, ताप, छाती भरणे, दम भरणे, जुनाट खोकला,
नाक चोंदणे, डोकेदुखी, सायनस, अर्धशिशी, कफ पातळ होतो
सांधेदुखी, आमवात, सूज, कंबर दुखी, पाठ दुखी, वेदनाशामक
स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी, अनियमित मासिक स्त्राव, पोट दुखी व कंबर दुखी,
लघवीच्या तक्रारी
सुंठ उष्ण असल्याने अतिप्रमाणात घेऊ नये
गर्भिणी, high ब्लडप्रेशर, अल्सर etc
कैयदेवनिघण्टु - १. ओषधिवर्ग
शुण्ठी
शुण्ठी महौषधं विश्वमौषधं विश्वभेषजम् |
नागरं कटुभद्रञ्च राहुच्छत्रं कटूत्कटम् ||११५१||
आर्दकेति आर्द्र शुण्ठी नामः |
नागरं मधुरं पाके स्निग्धोष्णं कटुकं लघु |
रुच्यं मलानां सङ्ग्राहि हृद्यं वायोर्विबन्धनुत् ||११५२||
दीपनं पाचनं वृष्यं स्वर्यं वातकफापहम् |
निहन्ति शूलहृद्रोगशोफार्शःश्लीपदोदरम् ||११५३||
आनाहश्वासकासामवमीहिध्मामपितलम् |
कटूष्णं दीपनं वृष्यं रुच्यमार्द्रकनागरम् ||११५४||
श्वासकासवमिहिक्कावातश्लेष्मविबन्धनुत् |११५५|
सुंठी ला महौषध तसेच विश्वभेशज असे म्हणतात । ती तिखट चवीची आहे ।स्निग्ध व पचायला हलकी आहे ।गरम आहे ।चव वाढविणारी ,पचन करणारी,वीर्य वाढविणारी ,आवाज चांगला करणारी ,बात व कफ कमी करणारी ,पोटदुखी ,हृदयरोग, सूज ,हत्तीरोग, मूळव्याध ,जलोदर ,पोटात वायू धरणे ,दमा, खोकला ,उचकी हे रोग बरे करणारी आहे । पित्त वाढवणारी ,वेदना कमी करणारी आहे
सुंठी मध्ये
कार्बोहायड्रेट, dietary fiber, fat,protein, vitamin B complex, vitamin C, vitamin E, असून
त्यात calcium, iron, magnesium, manganese, phosphorus, potassium, sodium, zinc आहे
2 दालचिनी
दालचिनी चवीला तिखट गोड असते, ती उष्ण दीपन, पाचक, कफनाशक,स्तंभक,मूत्रल गुणधर्माची आहे
पचनाचे विकार
अपचन, पोटदुखी, छातीत जळजळ, पोट गॅस धरणे,मळमळ, उलटी, जुलाब
सर्दी खोकला, श्वसनाचे विकार यात उपयोगी
हृदय विकारात गुणकारी, रक्त पुरवठा सुरळीत होतो
शरीरात रक्तातील साखर नियंत्रण ठेवते, इन्सुलिन नियंत्रण करते, वजन आटोक्यात ठेवते
स्त्री रोग
गर्भाशय व विकार, PCOS मध्ये उपयोग
वेदनाशामक असल्याने डोकेदुखी अंगदुखी कमी करते
दालचिनी व मध एकत्र खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तवाहिन्या तील cholesterol कमी करते, वजन आटोक्यात ठेवते, सांधेदुखी कमी करते, सर्दी खोकला, घसा खवखवणे, छातीतील कफ कमी होतो, अपचन, गॅस, ऍसिडिटी, जुलाब, अल्सर कमी होण्यास मदत होते,
डोकेदुखी, सायनस, अर्धशिशी यात उपयोग होतो,दातांच्या तक्रारी, तोंडाच्या तक्रारी कमी होतात
दालचिनी उष्ण असल्याने अति सेवनाने पित्त वाढू शकते
भावप्रकाश-पूर्वखण्ड-मिश्रप्रकरण - ३. कर्पूरादिवर्ग
त्वक्पत्र
त्वक्पत्रञ्च वराङ्गं स्याद् भृङ्गं चोचं तथोत्कटम् |
त्वचं लघूष्णं कटुकं स्वादु तिक्तञ्च रूक्षकम् |
पित्तलं कफवातघ्नं कण्ड्वामारुचिनाशनम् |
हृद्बस्तिरोगवातार्शःकृमिपीनसशुक्रहृत् ||५६||
दालचिनी मध्ये प्रथिने(proteins),oil (स्निग्ध पदार्थ),कार्बोहायड्रेट, असून त्यात phosphorus, sodium, potassium, thayamin, riboflavin, niacin, vitamin A व C आहेत
3 black pepper, कृष्ण मरीच, काळी मिरी
काळी मिरी
दीपन, पाचन, रोचन कार्य करते
ती उष्ण व चवीला तिखट आहे
औषधी उपयोग
अग्निमांद्य, भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, पोटात गॅस धरणे, जेवल्यावर पोट फुगणे, अपचन यासाठी काळी मिरीचा जेवणाआधी सॅलड वर सैंधव मीठ सोबत घ्यावे
काळ्या मिरीमुळे सर्दी खोकला, नाक चोंदणे, छातीत कफ भरणे या तक्रारी कमी होतात
मलेरिया ,डेंगू सारख्या तापात तुळशीच्या रसासोबत मधातून द्यावे
घसा खवखवत असेल तर , खोकला येत असल्यास याचा उपयोग होतो
काळी मिरी उष्ण असल्याने आम्लपित्त, उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी, गर्भिणी नी अति सेवन करू नये
भावप्रकाश-पूर्वखण्ड-मिश्रप्रकरण - २. हरीतक्यादिवर्ग
मरिच
मरिचं वेल्लजं कृष्णमूषणं धर्मपत्तनम् |
मरिचं कटुकं तीक्ष्णं दीपनं कफवातजित् |
उष्णं पित्तकरं रूक्षं श्वासशूलकृमीन्हरेत् ||५५||
तदार्द्रं मधुरं पाके नात्युष्णं कटुकं गुरु |
किञ्चित्तीक्ष्णगुणं श्लेष्मप्रसेकि स्यादपित्तलम् ||५६||
काळी मिरी
Black pepper
यामध्ये कार्बोहायड्रेट, protein, sodium, potassium, fiber असून vitamin A, vitamin B6, मॅग्नेशियम, iron, calcium आहे
4 तुळस
तुळस तिखट व कडू चवीची व उष्ण आहे ।हृदयाला बल देणारी ,दाह व पित्त वाढवणारी आहे ।कफ व वात कमी करणारी आहे । त्वचारोग , फुफ्फुसाचे रोग बरे करणारी ,भूक वाढविणारी , जंतुनाशक आहे
तुळस ला घरचा वैद्य म्हटले आहे
सर्दी, खोकला, ताप, दमा, मुख दुर्गंधी, श्वास दुर्गंधी, फुफ्फुसाचे रोग,हृदयाचे विकार, स्मृती भ्रंश,
या सर्व लक्षणांमध्ये तुळशीची ताजी पाने उपयुक्त आहेत
भावप्रकाश-पूर्वखण्ड-मिश्रप्रकरण - ५. पुष्पवर्ग
तुलसी
तुलसी सुरसा ग्राम्या सुलभा बहुमञ्जरी |
अपेतराक्षसी गौरी भूतघ्नी देवदुन्दुभिः ||५०||
तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाहपित्तकृत् |
दीपनी कुष्ठकृच्छ्रास्रपार्श्वरुक्कफवातजित् |
शुक्ला कृष्णा च तुलसी गुणैस्तुल्या प्रकीर्तिता ||५१||
Comments
Post a Comment