पंढरीची वारी,विठ्ठल पायी दिंडी, आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर
मुक्काम पंढरीची वारी,विठ्ठल पायी दिंडी, आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर पहिल्या मुक्कामी आळंदी सोडली पर्वतीची मिठी चरणा पडली ॥ दुसऱ्या मुक्कामी शनिवार वाडा प्रदक्षिणा घाली पुण्यवान घोडा ॥ तिसरी चढण सासवड घाट पुसू या मुक्तीची सोपानास वाट॥ चवथा दिवस जेजूरी गडाला हळद लाऊया खंडोबा रायाला ॥ पाचव्या दिवशी वाल्हा मुक्कामाला कथाकीर्तनात रात काढायला ॥ सहाव्या दिवशी नीरा प्रवाहात पांडुरंगासवे रखुमाई न्हात ॥ सातव्या दिसाचा जीवास आनंद पंढरीच झालं अवघं लोणंद ॥ तरडगावाची आठवी पायरी माऊली थांबते दत्ताच्या मंदीरी ॥ नऊ पावलात येई फलटण लीन झाला राजा घाली लोटांगण ॥ दहाव्या वस्तीचे बिडणी बरड जीवा वेडावते नाथांचं भारुड ॥ विसावा घ्यायचा नंदाच्या ओढ्याला चव अमृताची दह्याधपाट्यला ॥ अकराव्या रोजी नातेपुते गाठा ...