Posts

Showing posts with the label स्वरा भजनी मंडळ

अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा lyrics, स्वरा भजनी मंडळ,विठ्ठल भजन

अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा ।।धृ।। दर्शनासी व्याकुळ झालो रूप तुझे पहाया पावन होईन तव चरणासी पतित माझी काया 2 ऐलतीरी ये, पैलतीरी ने श्रीरंगा नदी भरली चरणी ।।1।। विठ्ठल विठ्ठल गजर घुमे हा दुमदुमली पंढरी टाळ मृदंग वाजत गाजत नाम तुझे श्रीहरी धावून ये मला दर्शन दे जिवलगा।।3।। नरदेही या व्यर्थ ठरलो नाही मुखी तव नाम हरी भक्ती वीण जीवन नाही मंत्र एक हरी नाम चरणी तू घे, मज ध्यास ही दे, पांडुरंगा ।।3।। भजनी तुझिया रंगुनी जाईन, निज ध्याते निज देही संत जनाचा संग घडे मज पापमुक्त मी होई भक्ती ही दे, मज मुक्ती ही दे निःसंगा।।4।।

भक्त दारी आला अंबे lyrics, स्वरा भजनी मंडळ

भक्त दारी आला अंबे जोगवा घाला  देवीचा जोगवा #healthnovel डॉ सौ अनघा कुलकर्णी भक्त दारी आला अंबे जोगवा घाला जोगवा घाला अंबे जोगवा घाला1 माहूर देशी गमन करुनी मूळ पीठ आली तुळजाआई उभी राहिली भक्त रक्षिण्याशी भावतीर्थी फुले वाहिली तुझिया पूजेला उदो उदो बोला अंबे उदो उदो बोला 2 रज तम गुण आम्ही मागे सारियले काम क्रोध मत्सर ही जाळून टाकीयले अहंकारी धूप आई आज जाळीला3 जगत जननी अंबाबाई पावे लवलाही हळदकुंकू भंडाराही सांडियला पायी सत्य वाचा वाणी माझी गाते गाण्याला4 जातो आई माघारी ग कृपा असू द्यावी सद्गुणांची परडी भरोनी भक्तालागी देई ज्ञानदीप भक्तीचा हा जगी उजळवी आशीर्वाद घेण्यासाठी भक्त भुकेला5

आषाढी वारी, स्वरा भजनी मंडळ, वारी भजन, भजन lyrics

पांडुरंगाच्या वारीला पालखी सजली पालखी सजली , माऊली रथात निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र आळंदी हुन झाले माऊलीचे आगमन मुखी विठुचा गजर सारी वैष्णव आनंदली।।1।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र देहू हुन झाले तुकोबा चे आगमन ज्ञानोबा तुकाराम भजनाने सारी पंढरी दुमदुमली।।2।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र हुन नाशिक हुन माऊली गुरू निवृत्ती नाथ पंढरीच्या दर्शनाला नाथ पंथी निघाले।।3।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण मुक्ताई पालखी आली लांब गावाहून चांगदेव  शिष्य झाला गुरू भगिनी माऊली।।4।। पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र हुन सासवड हुन माऊली बंधू सोपान धन्य धन्य ही पंढरी ब्रह्मनंदी टाळी झाली।।5।। स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी

स्वरा भजनी मंडळ,swara bhajani mandal, स्वरा, bhajan with lyrics

स्वरा भजनी मंडळ हा हौशी महिला चे भजन गायन मंडळ आहे, आम्ही घरगुती साधी सोपी वाद्ये वाजवून संगीताचा आनंद घेतो, lyrics दिलेली असल्याने तुम्ही सुद्धा भजन म्हणायला शिकू शकता, भजन या संगीत कलेमुळे मन उत्साही व आनंदी रहाते, मनाची अतिविचार करण्याची सवय कमी होते, रागावर नियंत्रण येते, चिडचिड कमी होते, विनाकारण बदबडण्याची सवय कमी होते, भजन गुणगुणल्यामुळे घरातही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मनाची अस्थिरता कमी होते , झोप शांत लागते. Health novel या युट्युब चॅनेल वर स्वरा भजनी मंडळाची शेकडो भजने आहेत, त्यातील काही स्वरचित आहेत, संतांचे अभंग आहेत, त्याचप्रमाणे काही हिंदी भजनेही आहेत महादेव भजन शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा पायात नुपूर छान।।1।। जटेतून वाहे झुळ झुळ गंगा डोक्यावर चांदोबा छान।।2।। शंकराच्या हातात डमरू त्रिशूल पायात खडावा छान।।3।। बेल पुष्पावरी महादेवाची प्रीती कपाळाला भस्म शोभे छान।।4।। घेऊन रुप भिल्लींण आली कैलास नाचत छान।।5।। डोळे उघडून शंकर पाही पार्वती दिसते छान।।6।। शंकराच्या मांडीवर गिरीजा गणपती शोभून दिसती छान।।7।।

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे,  पांडुरंगा गाव तुझं माहित नाही रे मला वाटते माझा तू रे, पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे कैसे तुझं आळवू ,पत्र कोठे पाठवू पत्ता तुझा माहीत नाही रे पांडुरंगा ।।1।। श्रुती सांगती देव आहे, गीता भागवतात तसाच माझा देव आहे पंढरपुरात भावाचा तो कागद, भक्तीची ती लेखणी मनाचा तो टप्पेखाना,टप्पेखाना बुद्धी चा तो पोस्टमन, त्याचे हाती पत्र धाडीते पांडुरंगा ।।2।। संत मंडळी पत्र धाडीती पंढरपुराला पत्र वाचूनी आनंद, झाला पांडुरंगाला साष्टांग नमस्कार देवा तुझ्या चरणाला तसाच माझा नमस्कार तुझ्या कुटुंबाला एवढे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे माझ्या देवराया रे पांडुरंगा भक्त लागे पाया रे।।3।। जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला पत्ता तुझा ठाऊक झाला रे पांडुरंगा ठाव तुझा माहीत झाला रे

राम राम म्हणता म्हणता ओसरले हे जीवन, रघुकुल नंदन कधी येशील रे

Image
राम राम म्हणता म्हणता ओसरले हे जीवन रघुकुल नंदन कधी येशील रे सुखविण्या हे लोचन स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी राम राम म्हणता म्हणता ओसरले हे जीवन रामनाम जपता स्मरता सरले क्षणभंगुर हे जीवन रघूकुलनंदन कधी येशील रे सुखविण्या हे लोचन ।1। भजन कीर्तन नाही करत शबरी एक साधी भिल्लींण। वाट कधीची मी बघते प्रभू कधी देशील दर्शन। चरण कमलाने माझी ही झोपडी करी रे लवकरी पावन।।2।। हर दिनी तू येशील म्हणुनी पद मार्ग ठेवते सजवून। रानावना तील कंदमुळे ठेविते मी जमवून। मधुर मधुर या बोरानी रे टोपल्या गेल्या भरून ।।3।। सुंदर मोहक रुपडे प्रभुचे डोळे भरून पाहीन। पद कमलांचे दर्शन स्पर्शन मस्तक झुकवून घेईन। विसरुनी गेला प्रभू तुम्ही मजला जाब मी विचारेन।।4।।