कैरीची आंबट गोड शाही चटणी

Green mango chutney , फाईव्ह स्टार रेसिपी, nutritious, delicious, easy  and quick receipe, karnataka special

Dr Anagha Kulkarni

साहित्य
1 एक तोतापुरी किंवा साध्या कोणत्याही आंब्याची कच्ची कैरी
2 वाळलेले गोटा खोबरे
3 गूळ
4 हळद पावडर
5 तिखट पावडर
6 हिंग पावडर
7 मेथीचे दाणे
8 मीठ /सैंधव/pink salt
9 फोडणीसाठी
तेल, मोहरीचे दाणे, हळद पूड व हिंग
10 खिसणी, साल कटर, मिक्सर,  छोटी कढई इ इ

कृती
 कैरी /कच्चा आंबा धुवून पुसून कोरडा करणे, त्यानंतर त्याची सालकटर ने साल काढणे व नंतर खिसणी ने खिसणे.
वाळलेले खोबरे खिसून घेणे व बारीक गॅसवर पॅन मध्ये खोबरे किंचित लालसर भाजून घेणे.खोबरे गार करून घेणे.
गूळ बारीक करून घेणे, सर्व समप्रमाणात घेणे.
तिन्ही वस्तू मिक्सर च्या भांड्यात मिक्स करावे.
स्वतःच्या चवीनुसार तिखट, हळद, हिंग व मीठ त्यात घालावे.
फोडणीच्या कढईत तेल गरम करून त्यात मेथीचे दाणे लालसर तळून घ्यावेत व गार झाल्यावर छोट्या खलबत्त्यात कुटून घ्यावे, व मिक्सर मध्ये सर्व मिश्रणात घालावे.
मिक्सर सुरू करावा व मिश्रण बारीक करून घ्यावे , एकसंध लगदा झाला की तयार चटणी.
आता या चटणीला गार फोडणी घालावी.
फोडणी आधीच करावी,
तेल कढईत गरम करून त्यात मोहरीचे दाणे टाकावेत, ते ताडताड उडल्यावर गॅस बंद करून कढई खाली उतरवावी व गरम तेलात हळद व हिंग टाकावा व फोडणी पूर्ण गार होऊ द्यावी.
मिक्सर मधील चटणी डब्यात/ बरणीत भरावी व त्यावर गार फोडणी घालावी.
दुसऱ्या दिवशी ही चटणी छान मुरते व ती खाण्यास घ्यावी

ही चटणी पुढील प्रमाणे खावी
चपाती, भाकरी, पुरी, थालीपीठ, डोस, उत्तप्पा, पास्ता, उपमा, सँडविच, ब्रेड यासोबत अतिशय चविष्ट लागते.
त्याचप्रमाणे
दही भात, तूप भात, फोडणीचा भात, पुलाव यासोबत रुचकर लागते.
नुसतीच चाटून खाण्यासाठी सुद्धा चालते.
आजारपणात तोंडाला चव नसते, भूक लागत नाही, मळमळ, जुनाट आजार अश्या वेळी ही चटणी द्यावी
कैरीचा आंबट पणा, गुळाची गोडी आणि मेथीचा कडवटपणा यामुळे ही चटणी अतिशय लज्जतदार , रुचकर चविष्ट असून पौष्टिक ही आहे.
लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वाना हवीहवीशी वाटणारी अशी ही कैरीची आंबट गोड शाही चटणी.

डॉ सौ अनघा कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर