राम राम म्हणता म्हणता ओसरले हे जीवन, रघुकुल नंदन कधी येशील रे
राम राम म्हणता म्हणता ओसरले हे जीवन
रघुकुल नंदन कधी येशील रे
सुखविण्या हे लोचन
स्वर रचना व गायन
डॉ सौ अनघा कुलकर्णी
राम राम म्हणता म्हणता
ओसरले हे जीवन
रामनाम जपता स्मरता सरले
क्षणभंगुर हे जीवन
रघूकुलनंदन कधी येशील रे
सुखविण्या हे लोचन ।1।
भजन कीर्तन नाही करत
शबरी एक साधी भिल्लींण।
वाट कधीची मी बघते प्रभू
कधी देशील दर्शन।
चरण कमलाने माझी ही झोपडी
करी रे लवकरी पावन।।2।।
हर दिनी तू येशील म्हणुनी
पद मार्ग ठेवते सजवून।
रानावना तील कंदमुळे
ठेविते मी जमवून।
मधुर मधुर या बोरानी रे
टोपल्या गेल्या भरून ।।3।।
सुंदर मोहक रुपडे प्रभुचे
डोळे भरून पाहीन।
पद कमलांचे दर्शन स्पर्शन
मस्तक झुकवून घेईन।
विसरुनी गेला प्रभू तुम्ही मजला
जाब मी विचारेन।।4।।
रघुकुल नंदन कधी येशील रे
सुखविण्या हे लोचन
स्वर रचना व गायन
डॉ सौ अनघा कुलकर्णी
राम राम म्हणता म्हणता
ओसरले हे जीवन
रामनाम जपता स्मरता सरले
क्षणभंगुर हे जीवन
रघूकुलनंदन कधी येशील रे
सुखविण्या हे लोचन ।1।
भजन कीर्तन नाही करत
शबरी एक साधी भिल्लींण।
वाट कधीची मी बघते प्रभू
कधी देशील दर्शन।
चरण कमलाने माझी ही झोपडी
करी रे लवकरी पावन।।2।।
हर दिनी तू येशील म्हणुनी
पद मार्ग ठेवते सजवून।
रानावना तील कंदमुळे
ठेविते मी जमवून।
मधुर मधुर या बोरानी रे
टोपल्या गेल्या भरून ।।3।।
सुंदर मोहक रुपडे प्रभुचे
डोळे भरून पाहीन।
पद कमलांचे दर्शन स्पर्शन
मस्तक झुकवून घेईन।
विसरुनी गेला प्रभू तुम्ही मजला
जाब मी विचारेन।।4।।
Comments
Post a Comment