कोरोना जनजागृती,Corona bharud bhajan,कोरोना आला भारुड भजन,

महापूर गेला करोना आला अवचित जागतिक संकट,
 अवचित संकट उपाय
शोधा लवकर
अरे अरे अरे करोना आला

अग बाई बाई कारोना आला
देवा रे देवा करोना आला
करोना आला करोना आला
करोना आला हो

कोविद 19 म्हणजे महाभयंकर रोग आहे
जगाची जीवित हानी होत आहे
याची सर्वांना जाणीव आहे
म्हणून म्हणते घरात थांबा१
अरे अरे

करोना म्हणजे विषाणू
भलता ची आहे जीव घेणू
या कोरोनाला उतारा
धूप कापूर घरात फवारा
त्यानेच रोग जाईल सरसरा २

घर परिसर स्वच्छ ठेवा
आणि जंतुनाशके फवारा
तोंडाला मास्क लावा
आणि
हाताला सेनिटायझर लावा ३

घर परिसर स्वच्छ करुनी
अवघे वातावरण शुध्द करुनी
व्यवहार करा अंतर ठेऊनी
आणि
करोना ला लावा पळवूनी4

डॉ नर्स पोलीस प्रशासन
यांचे आभार माना

आपण घरात सुरक्षित असून
त्यांनी केला कोरोना शी सामना
त्यांचे उपकार सदैव जाणा
आणि
करू नका त्यांच्याशी कृतघ्न पणा 5
आज ना उद्या पुन्हा जग सुरू होईल
देवळं आणि मॉल उघडतील
तेव्हा
विसरू नका नियमांना,
विसरू नका lock down ला
विसरू नका कोरोनाच्या अस्तित्वाला 6

अश्या विषाणूंना निष्प्रभ करुया
शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवूया
घरचे ताजे अन्न खाऊन आरोग्य मिळवूया
आणि मग
जिवाणू येतील जातील
विषाणू येतील जातील
मानव सदैव सुरक्षित राहील

स्वर रचना
डॉ सौ अनघा कुलकर्णी व
सौ सुवर्णा शेवडे

#health novel
#corona virus awareness
@@dr anagha kulkarni

Comments

Popular posts from this blog

अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा lyrics, स्वरा भजनी मंडळ,विठ्ठल भजन

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना lyrics