Ayurvedic holistic approach against COVID19
Ayurvedic holistic approach against corona virus
Sushrut sutrasthan 6
आयुर्वेदिक शास्त्रानुसार कोरोना विषाणू चा संसर्ग कसा टाळता येईल?
डॉ सौ अनघा कुलकर्णी
आयुर्वेदाचार्य
https://youtu.be/a4sWRsSIj7o
कदाचिदव्यापन्नेष्वपि ऋतुषु कृत्याभिशापरक्षःक्रोधाधर्मैरुपध्वस्यन्ते जनपदाः, विषौषधिपुष्पगन्धेन वा वायुनोपनीतेनाक्रम्यते यो देशस्तत्र दोषप्रकृत्यविशेषेण कासश्वासवमथुप्रतिश्यायशिरोरुग्ज्वरैरुपतप्यन्ते, ग्रहनक्षत्रचरितैर्वा, गृहदारशयनासनयानवाहनमणिरत्नोपकरणगर्हितलक्षणनिमित्तप्रादुर्भावैर्वा ||१९||
तत्र, स्थानपरित्यागशान्तिकर्मप्रायश्चित्तमङ्गलजपहोमोपहारेज्याञ्जलिनमस्कारतपोनियम- दयादानदीक्षाभ्युपगमदेवताब्राह्मणगुरुपरैर्भवितव्यम्, एवं साधु भवति ||२०||
सुश्रुतसंहिता
सूत्रस्थानम् - ६. ऋतुचर्याध्यायः
कधी कधी ऋतू योग्य असूनही कृत्या म्हणजेच मंत्रादिंच्या वाईट वापरामुळे, गुरू, सिद्ध व्यक्तींच्या शापामुळे, राक्षस, पिशाचादींच्या क्रोधामुळे व अधर्मामुळे देशाच्या देश नष्ट होतात. कधी कधी विषयुक्त पुष्पाच्या गंधामुळे वायू दूषित होऊन दोष व प्रकृतीची इतर कोणत्याही कारणाने दुष्टी नसताना कास, श्वास, च्छर्दी, प्रतिश्याय, शिरः शूल तसेच यांनी देशवासी पीडित होतात किंवा सूर्यादी ग्रह तसेच अश्विन्यादि नक्षत्राच्या अनिष्ट प्रभावामुळे व्याधी उत्पन्न होतात. घर, स्त्री, शयन शय्या, आसन, प्रवास, वाहन, मणी, रत्न तसेच अन्य उपकरणांच्या दुष्टीमुळे अशुभ लक्षणसूचक रोग प्रादुर्भाव झालेला दिसून येतो.
त्यावेळी स्थलांतर, शांती करणे, प्रायश्चित्त, मंगल, जप, हवन, बलिदान, यज्ञ, हात जोडून नमस्कार, तप, नियम, दया, दान, दीक्षाग्रहण तसेच देवता, ब्राह्मण आणि गुरू यांची श्रद्धापूर्वक भक्ती केली पाहिजे त्यामुळे त्या रोगांची शांती होते.
संकलन
डॉ सौ अनघा श्रीराम कुलकर्णी
डॉ संजय शेलार
डॉ एकनाथ कुलकर्णी
खूप छान उद्बोधक माहिती ॥धन्यवाद॥
ReplyDeleteखूप छान उद्बोधक माहिती ॥धन्यवाद॥
ReplyDelete