Posts

Showing posts with the label श्रावण शुक्रवार जिवतीची आरती

श्री जिवतीची आरती|श्रावण शुक्रवार जिवतीची आरती

श्री जिवतीची आरती श्रावण शुक्रवार जिवतीची आरती जयदेवी जयदेवी जय जिवती जननी  सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥ श्रावण येतांची आणूं प्रतिमा  गृहांत स्थापूनी करुं पूजना  आघाडा दूर्वा माळा वाहूं या  अक्षता घेऊनी कहाणी सांगू या ॥ १ ॥ जयदेवी जयदेवी जय जिवती जननी  सुखी ठेवी संतति विनंती तव चरणी  पुरणपोळीचा नैवेद्द दावू । सुवासिनींना भोजन देऊ । चणे हळदिकुंकू दूधही देऊं । जमुनी आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥ जयदेवी जयदेवी जय जिवती जननी  सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी  सटवीची बाधा होई बाळांना । सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना । यासाठी तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥ जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी  तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । वंशाचा वेल वाढूं दे । सेवा हे व्रत नित्य घडूं दे । मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥ जयदेवी जयदेवी जय जिवती जननी  सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी