कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी lyrics

कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी
झाड फुलांनी आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुन मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी

देव बोलतो बाळमुखातुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होउनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी

Comments

Popular posts from this blog

अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा lyrics, स्वरा भजनी मंडळ,विठ्ठल भजन

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना lyrics