जिवतीची आरती,श्रावण शुक्रवार आरती
जिवतीची आरती,देवीची आरती,श्रावण शुक्रवार आरती जयदेवी जयदेवी जय जिवती जननी सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥ श्रावण शुक्रवारी आणूं प्रतिमा घरात स्थापूनी करु पूजना आघाडा दूर्वा माळा वाहूं या अक्षता वाहूनी कहाणी सांगू या 1 पुरणपोळीचा नैवेद् करू सुवासिनींना भोजन घालू चणे हळद कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ 2 सटवीची बाधा होतसे बाळांना सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना यासाठी तुजला करिती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना 3