सब्जा, तुळस बी, sweet basil याचा आरोग्यासाठी उपयोग
सब्जा, तुळस बी, sweet basil याचा आरोग्यासाठी उपयोग डॉ सौ अनघा कुलकर्णी 29 मे 2020 Holy basil म्हणजे अंगणातली तुळस व Sweet basil म्हणजे सब्जा, याला असणाऱ्या उग्र वासामुळे कामकस्तुरी असेही म्हणतात सब्जा बी गुणाने थंड , मधुर असते तसेच यामध्ये calcium, फायबर,पोटॅशियम, मॅग्नेशियम, तसेच व्हिटॅमिन A, K, E, B असते सब्जा चे सेवन केल्याने अंगातील उष्णता कमी होते, ऍसिडिटी, लघवीला जळजळ, पोटात आग पडणे ही लक्षणे कमी होतात लिंबूपाणी, दही, ताक,सरबत, मिल्कशेक, ice cream यासोबत सब्जाचे बी घेतात, पाण्यात आधी सब्जा बी भिजवावे, ते फुगते नंतर ते खावे, त्याची खीर करून खाल्ली तरी छान लागते झोपण्यापूर्वी 1 चमचा सब्जा बी 1 कप दुधात भिजवून त्यात वेलची पावडर घालून घेतले असता बद्धकोष्ठता चा त्रास कमी होतो, झोप ही शांत लागते डायबेटिस मध्ये बऱ्याच वेळा रात्री भूक लागते,रक्तातील साखर अचानक कमी होते अश्यावेळी रात्री सब्जा बी घेतल्याने त्रास होत नाही सब्जा बी मधील फायबर, पोटॅशियम मुळे bad cholesterol नियंत्रण रहाते, रक्तवाहिन्या लवचिक रहातात व रक्तदाब कमी होण्यास मदत होते हृदय विकार , स्ट्रोक मध्ये याचा च...