सब्जा, तुळस बी, sweet basil याचा आरोग्यासाठी उपयोग

सब्जा, तुळस बी, sweet basil 
याचा आरोग्यासाठी उपयोग

डॉ सौ अनघा कुलकर्णी
29 मे 2020

Holy basil म्हणजे अंगणातली तुळस व
Sweet basil म्हणजे सब्जा, याला असणाऱ्या उग्र वासामुळे कामकस्तुरी असेही म्हणतात
सब्जा बी गुणाने थंड , मधुर असते तसेच यामध्ये calcium, फायबर,पोटॅशियम, मॅग्नेशियम, तसेच व्हिटॅमिन A, K, E, B असते

सब्जा चे सेवन केल्याने अंगातील उष्णता कमी होते, ऍसिडिटी,  लघवीला जळजळ, पोटात आग पडणे ही लक्षणे कमी होतात
लिंबूपाणी, दही, ताक,सरबत, मिल्कशेक, ice cream यासोबत सब्जाचे बी घेतात, पाण्यात आधी सब्जा बी भिजवावे, ते फुगते नंतर ते खावे, त्याची खीर करून खाल्ली तरी छान लागते

झोपण्यापूर्वी 1 चमचा सब्जा बी 1 कप दुधात भिजवून त्यात वेलची पावडर घालून घेतले असता बद्धकोष्ठता चा त्रास कमी होतो, झोप ही शांत लागते

डायबेटिस मध्ये बऱ्याच वेळा रात्री भूक लागते,रक्तातील साखर अचानक कमी होते अश्यावेळी रात्री सब्जा बी घेतल्याने त्रास होत नाही

सब्जा बी मधील फायबर, पोटॅशियम मुळे bad cholesterol नियंत्रण रहाते, रक्तवाहिन्या लवचिक रहातात व रक्तदाब कमी होण्यास मदत होते

हृदय विकार , स्ट्रोक मध्ये याचा चांगला उपयोग होतो

जुनाट आजार, तसेच 40 वयानंतर हाडातील कॅल्शियम कमी होते हाडे ठिसूळ होतात अश्या वेळी सब्जा बी घेतल्याने उपयोग होतो
शरीरातील अतिरिक्त मेद कमी होतो, भूक कमी लागते, पोट भरल्याची भावना रहाते त्यामुळे वजन आटोक्यात रहाते

नैराश्य, अशक्तपणा असताना सब्जा बी घेतल्याने ताकत येते, उत्साह वाढतो

उष्णतेमुळे तोंड येणे यासाठी उपयुक्त
डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त
Mental stress मुळे चिडचिड होत असेल तर यामुळे पाण्यातून याचे सेवन केले की आराम मिळतो

High fever मध्ये दिल्याने व्हिटॅमिन व मिनरल्स मुळे अशक्तपणा येत नाही, अंगदुखी कमी होते व ताप नियंत्रण होते

केस  व त्वचा यांचे पोषण करते
चेहेऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम व तजेलदार होते

गर्भवती स्त्रीयांनी घेऊ नये गर्भास धोका होऊ शकतो
लहान मुलांना दिल्यास पोटात फुगून पोट दुखू शकते

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर