जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना lyrics
जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना ||1|| कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना||2|| नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना ||3|| दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना||4|| युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।|5|| स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना||6|| तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना||7|| विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीप|दवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना||8|| जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।|9| चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले...