येऊ कशी मी नांदायला, कोरोना आलाय दाराला

कोरोना आलाय आता दाराला 
सवयी लावेल मला बदलायला
येऊ कशी कशी मी नांदायला हो
कोरोना आलाय दाराला

हिंडणे फिरणे बाहेरच जेवणे
नकोसे झाले घरचे खाणे
उशिरा उठणे उशिरा झोपणे
निमंत्रण जाईल रोगाला हो
कोरोना आला सवयी बदलायला 1
शनिवार आला की पार्टी करणे
रविवारी पिकनिक व मॉल ला जाणे
येताना पिझ्झा बर्गर खाणे
लागेल आता बंद करायला हो 2
कोरोना आलाय सवयी बदलायला

सुट्टी आली चला परदेशाला
किमान जाऊया गोव्याला
दारू मटण चैन करायला
आता नाही झेपणार आरोग्याला
कोरोना आलाय सवयी बदलायला4

आता मास्क लावा हात धुवा
लांब राहून जनसंपर्क टाळा
रामायण महाभारत बघायचं
अन
घरातच tv लावायचा हो
घरातच जेवण करायचं 
घरातून काम करायचं हो
कॉटवर पडून लोळायच
मोबाईल वर देव दर्शन करायचं हो

Life आता modify करायचं
स्वर रचना
डॉ सौ अनघा कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर