Posts

Showing posts with the label green mango chutney

कैरीची आंबट गोड शाही चटणी

Image
Green mango chutney , फाईव्ह स्टार रेसिपी, nutritious, delicious, easy  and quick receipe, karnataka special Dr Anagha Kulkarni साहित्य 1 एक तोतापुरी किंवा साध्या कोणत्याही आंब्याची कच्ची कैरी 2 वाळलेले गोटा खोबरे 3 गूळ 4 हळद पावडर 5 तिखट पावडर 6 हिंग पावडर 7 मेथीचे दाणे 8 मीठ /सैंधव/pink salt 9 फोडणीसाठी तेल, मोहरीचे दाणे, हळद पूड व हिंग 10 खिसणी, साल कटर, मिक्सर,  छोटी कढई इ इ कृती  कैरी /कच्चा आंबा धुवून पुसून कोरडा करणे, त्यानंतर त्याची सालकटर ने साल काढणे व नंतर खिसणी ने खिसणे. वाळलेले खोबरे खिसून घेणे व बारीक गॅसवर पॅन मध्ये खोबरे किंचित लालसर भाजून घेणे.खोबरे गार करून घेणे. गूळ बारीक करून घेणे, सर्व समप्रमाणात घेणे. तिन्ही वस्तू मिक्सर च्या भांड्यात मिक्स करावे. स्वतःच्या चवीनुसार तिखट, हळद, हिंग व मीठ त्यात घालावे. फोडणीच्या कढईत तेल गरम करून त्यात मेथीचे दाणे लालसर तळून घ्यावेत व गार झाल्यावर छोट्या खलबत्त्यात कुटून घ्यावे, व मिक्सर मध्ये सर्व मिश्रणात घालावे. मिक्सर सुरू करावा व मिश्रण बारीक करून घ्यावे , एकसंध लगदा झाला की त...