Posts

Showing posts with the label swara bhajani mandal

swara , पांडुरंगा गाव तुझं माहित नाही रे lyrics

जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे,  पांडुरंगा गाव तुझं माहित नाही रे मला वाटते माझा तू रे, पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे कैसे तुझं आळवू ,पत्र कोठे पाठवू पत्ता तुझा माहीत नाही रे पांडुरंगा ।।1।। श्रुती सांगती देव आहे, गीता भागवतात तसाच माझा देव आहे पंढरपुरात भावाचा तो कागद, भक्तीची ती लेखणी मनाचा तो टप्पेखाना,टप्पेखाना बुद्धी चा तो पोस्टमन, त्याचे हाती पत्र धाडीते पांडुरंगा ।।2।। संत मंडळी पत्र धाडीती पंढरपुराला पत्र वाचूनी आनंद, झाला पांडुरंगाला साष्टांग नमस्कार देवा तुझ्या चरणाला तसाच माझा नमस्कार तुझ्या कुटुंबाला एवढे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे माझ्या देवराया रे पांडुरंगा भक्त लागे पाया रे।।3।। जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला पत्ता तुझा ठाऊक झाला रे पांडुरंगा ठाव तुझा माहीत झाला रे

स्वरा भजनी मंडळ,swara bhajani mandal, स्वरा, bhajan with lyrics

स्वरा भजनी मंडळ हा हौशी महिला चे भजन गायन मंडळ आहे, आम्ही घरगुती साधी सोपी वाद्ये वाजवून संगीताचा आनंद घेतो, lyrics दिलेली असल्याने तुम्ही सुद्धा भजन म्हणायला शिकू शकता, भजन या संगीत कलेमुळे मन उत्साही व आनंदी रहाते, मनाची अतिविचार करण्याची सवय कमी होते, रागावर नियंत्रण येते, चिडचिड कमी होते, विनाकारण बदबडण्याची सवय कमी होते, भजन गुणगुणल्यामुळे घरातही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मनाची अस्थिरता कमी होते , झोप शांत लागते. Health novel या युट्युब चॅनेल वर स्वरा भजनी मंडळाची शेकडो भजने आहेत, त्यातील काही स्वरचित आहेत, संतांचे अभंग आहेत, त्याचप्रमाणे काही हिंदी भजनेही आहेत महादेव भजन शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा पायात नुपूर छान।।1।। जटेतून वाहे झुळ झुळ गंगा डोक्यावर चांदोबा छान।।2।। शंकराच्या हातात डमरू त्रिशूल पायात खडावा छान।।3।। बेल पुष्पावरी महादेवाची प्रीती कपाळाला भस्म शोभे छान।।4।। घेऊन रुप भिल्लींण आली कैलास नाचत छान।।5।। डोळे उघडून शंकर पाही पार्वती दिसते छान।।6।। शंकराच्या मांडीवर गिरीजा गणपती शोभून दिसती छान।।7।।

श्रीराम भजन |नको धीर सोडू श्रीराम भेटेल कधी ना कधी

मना धीर ना सोडू नको विचार करू भगवंत मिळेल कधी ना कधी श्रीराम भेटेल कधी न कधी 1 कळीतुन उमलेलं, फुलातून फुलेल काट्यात रुतेल कधी ना कधी 2 गंगेच्या काठी, यमुनेच्या तीरी शरयु च्या नौकेत कधी न कधी 3 काशीत वसे मथुरेत दिसे अयोध्येच्या प्रासादी कधी ना कधी 4 देवळात नसे घरातही नसे कोविड योद्धा बने भक्ता रक्षिण्या सी5 स्वर रचना डॉ सौ अनघा कुलकर्णी #happy and healthy life at home #health novel