वसा, चरबी,मेद,fat
स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे तेल आणि घन असलेले स्निग्ध पदार्थ या दोहोंना मिळून ‘फॅट्स’ म्हणतात. भारतीय आहारशास्त्र मार्गदर्शन करताना सांगते की खाण्याच्या तेलांचा वापर माफक प्रमाणात करा आणि प्राणिजन्य पदार्थ आणि तूप/लोणी/वनस्पती तूप यांचा कमीत कमी वापर करा. याचाच अर्थ वनस्पती किंवा प्राणिजन्य स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात वापरल्याने रक्तातील फॅट्स किंवा लिपिड्स वाढतात, ज्यामुळे मग हृदयविकार आणि इतर आजारांचा धोका वाढतो. फॅट्समध्ये ऊर्जा भरपूर प्रमाणात असते, म्हणूनच ते माफक प्रमाणात खायला पाहिजे. तरीसुद्धा तरुण मुलांच्या वाढीसाठी जास्त ऊर्जायुक्त आहाराची गरज असते, जे आपल्याला त्यांच्या आहारात पुरेसे स्निग्ध पदार्थ समाविष्ट करून मिळवता येईल कारण ते भरपूर प्रमाणात डाळी, कडधान्ये असलेला आहार सेवन करू शकत नाही. दोन उपयुक्त फॅटी ऍसिड्स ज्यांची नावे आहेत- लिनोलिक आणि अल्फालिनोलेनिक ऍसिड- हे शरीरात निरनिराळ्या ठिकाणी विघटित केले जातात ज्यापासून जीवशास्त्रीयदृष्ट्या क्रियाशील असलेले संयुक्त घटक निर्माण केले जातात जे शरीराची विविध कार्ये करतात. चरबीयुक्त पदार्थांची भूमिका हे पदार्थांची...