Weight loss tips, वजन कमी न होण्याची कारणे

वजन कमी न होण्याची कारणे,
weight loss tips

रचना
डॉ सौ अनघा कुलकर्णी व मैत्रिणी

चाल चालले तरी वजन कमी होईना
धाव धावले तरी काटा काही हलेना

सकाळी उठल्यावर भूक लागली फार
चहात बुडवून खाल्ली बिस्किटे चार

मग मारल्या थोड्या दोरीवरच्या उड्या
आईने दिल्या ताज्या खमंग खोबऱ्याच्या वड्या

योगासने करायची मग झाली वेळ
चवीसाठी खाल्ली थोडी मस्त उसळ

व्यायामाच्या गडबडीत सकाळ गेली पळून
जेवणासाठी घेतले वडे गरम तळून

मुखशुद्धी साठी खाल्ले काजू बदाम
जेवणासाठी बघितला tv झोपून आराम

संध्याकाळ होताच केले join जिम
येतांना खाल्ले ice cream कारण आलेला घाम

वजन कमी करण्यासाठी चालत गेले घरी
Mr नी आणलेली श्रीखंड पुरी

दुसऱ्या दिवशी सकाळी बघितले वजन
मनःशांती साठी youtube वर बघितले भजन

Mind body soul साठी yoga ही बघितला
सुंदर रेसिपी बघण्यासाठी
Happy & healthy life at home चॅनेल subscribe केला

Health tips, beauty tips बघितल्या छान
Comment करून share करून दमले फार

Order च करते आता online जेवण
पुन्हा कधीतरी करूया काट्यावरी वजन

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर