importance of thermal scanner in day today life| कोरोना पासून बचाव
मास्क, सॅनिटीझर आणि ......?बनले आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग
Dr Anagha Kulkarni
कोरोना विषाणू च्या अस्तित्वा मुळे यापुढे बराच काळ आपल्याला जागरूक रहावे लागणार आहे
2020 हे साल आपल्या आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी महत्वाचे ठरले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी
1 मास्क
2 सॅनिटायझर
3 जनसंपर्क टाळणे, social distancing पाळणे
या तीन महत्वाच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे
ज्यामुळे आपण स्वतः सुरक्षित राहून दुसऱ्याची सुरक्षित ता ही धोक्यात आणत नाही
आणि एक वस्तू प्रत्येकाने आपल्या घरात ठेवली पाहिजे ती म्हणजे
Temperature gun
ज्यामुळे घरातील सर्वांचे शरीराचे तापमान वारंवार बघणे शक्य आहे.
यामुळे शरीरात कणकण वाटणे, अंगदुखी, सर्दी, खोकला, घश्याची खवखव आदी सुरू होण्याआधी काळजी घेणे शक्य होईल
घरोघरी ज्याप्रमाणे थर्मामीटर असतो त्याप्रमाणे आता thermal gun असणे ही आवश्यक आहे.
शरीरात जेव्हा जंतुसंसर्ग किंवा विषाणू संसर्ग होतो त्यावेळी शरीरातील रोगप्रतिकारक पेशी बाहेरून येणाऱ्या या जंतू /विषाणू ला प्रतिकार करतात.त्यामुळे शरीराचे नैसर्गिक रित्या तापमान वाढते. त्याला आपण ताप आला असे म्हणतो.
रोग प्रतिकारक शक्ती चांगली असेल तर जंतू/विषाणूंना निष्प्रभ /निष्क्रिय बनवतात.जर रोगप्रतिकारक शक्ती कमी पडली तर जंतू /विषाणू चा प्रादुर्भाव/प्रभाव वाढतो व रोग निर्मिती व वृद्धी होते.
त्यामुळे योग्य वेळी काळजी घेतल्याने रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो व शरीराची कमीत कमी हानी होते.
यासाठी शरीराच्या तापमानातील बदल जाणून जागरूक रहाणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
यासाठी
1मास्क
2 सॅनिटायझर
3 thermal / temperature gun घरात असणे अत्यावश्यक आहे
4 goggle डोळ्यांच्या द्वारे संसर्ग होऊन रोग वाढू शकतो
Dr Mrs Anagha Kulkarni
INDIA
Comments
Post a Comment