Posts

Showing posts with the label जिवती पूजन व आरती

जिवती पूजन व आरती,श्रावण शुक्रवार पूजा

Image
जयदेवी जयदेवी  जय जिवती जननी  सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥ श्रावण शुक्रवारी आणूं प्रतिमा  घरात स्थापूनी करु पूजना  आघाडा दूर्वा माळा वाहूं या  अक्षता वाहूनी कहाणी सांगू या  1 पुरणपोळीचा नैवेद् करू  सुवासिनींना भोजन घालू  चणे हळद कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ 2 सटवीची बाधा होतसे बाळांना  सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना  यासाठी तुजला करिती प्रार्थना  पूर्ण ही करी मनोकामना 3 #आपली संस्कृती व शास्त्र. #जिवती ,नाग नरसोबा व बुधबृहस्पती माहिती.. #जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ   मानवाला अनादी काळापासून घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे. या आदराचं रूपांतर त्या अनाकलनीय गूढाचा सत्कार व पूजन करण्यात झालं. यातूनच ते गूढ पिढ्यांपिढ्या पुजल्या जाऊ लागलं . असाच एक गूढ दार पिढ्यांनी पुजलं ते 'जिवती पूजन' या रूपात.  कोण ही जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? जिवती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? हे  आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा ल...