Posts

Showing posts with the label कोरोना गीत

रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात,अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात,stay home stay safe

Image
रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात संसाराचा हा व्याप लक्ष लागेना कामात दर्शनाची आस मोठी लागली मनास  1 हा कोरोनाचा त्रास व्यापून असे विश्वास मायमाऊली मानवास या दे ग आशीष 2 आर्थिक संकट हे फार असे अन्नाचा दुष्काळ अभय देऊन जगतास या कर भयमुक्त 3 आई आम्ही ग चुकलो निसर्गास विसरलो प्राणी, पाणी, हवा यांची महती ग विसरलो 4 माते घे चुका पोटात एक वेळ दे संधी पामरास नियम पाळून आरोग्य राखून सुधारीन  हे मी जीवन 5 स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी

येऊ कशी मी नांदायला, कोरोना आलाय दाराला

Image
कोरोना आलाय आता दाराला  सवयी लावेल मला बदलायला येऊ कशी कशी मी नांदायला हो कोरोना आलाय दाराला हिंडणे फिरणे बाहेरच जेवणे नकोसे झाले घरचे खाणे उशिरा उठणे उशिरा झोपणे निमंत्रण जाईल रोगाला हो कोरोना आला सवयी बदलायला 1 शनिवार आला की पार्टी करणे रविवारी पिकनिक व मॉल ला जाणे येताना पिझ्झा बर्गर खाणे लागेल आता बंद करायला हो 2 कोरोना आलाय सवयी बदलायला सुट्टी आली चला परदेशाला किमान जाऊया गोव्याला दारू मटण चैन करायला आता नाही झेपणार आरोग्याला कोरोना आलाय सवयी बदलायला4 आता मास्क लावा हात धुवा लांब राहून जनसंपर्क टाळा रामायण महाभारत बघायचं अन घरातच tv लावायचा हो घरातच जेवण करायचं  घरातून काम करायचं हो कॉटवर पडून लोळायच मोबाईल वर देव दर्शन करायचं हो Life आता modify करायचं स्वर रचना डॉ सौ अनघा कुलकर्णी

हात विसळ रे बाळा नको करू तू कंटाळा कोरोना जनजागृती गीत स्वर रचना व गायनडॉ सौ अनघा कुलकर्णी

Image
हात विसळ रे बाळा नको करू तू कंटाळा कोरोना जनजागृती गीत स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी बाहेर तू जाऊ नको रे गप्पा कट्ट्यावर मारू नको रे वाढवशील कोरोनाचा हा पसारा 1 घरात सगळ्यांनी मास्क बांधा रे फोडणीच्या वासानी खोकला येईल रे फ्रिज मधील गार पाणी तुम्ही टाळा 2 आईस्क्रीम बर्गर पिझ्झा खाऊ नका रे सारखी खाय खाय तुम्ही टाळा रे गॅस जवळ उभे राहून येतोय कंटाळा 3 अहो तुम्ही का बरे चिडता घरात बसून जीव यांचा पिडला TV चॅनेल बघून फार गोंधळ माजला 4