स्त्रिया व घरकाम
स्त्रियांना काम करताना आनंद होतो का स्त्रियांना कधी कामं करताना पहाल तर दिसेल त्या फिरत गरगरत कामं करतात,सतत उठताना बसताना दिसतात,कारण कामं चहूदिशेला असतात,एका सरळ रेषेतलं एकच एक मोठं काम नसतं तर लहानसहान वेगवेगळी कामं असतात,म्हणूनच काय आणि किती केलं हे कधी मोजता येत नाही,दिवसाच्या शेवटी सगळं जागच्या जागी हेच उत्तर असतं आणि ईतरांच्या यशात असणारा पण न दिसणारा वाटा हेच यश असतं.प्रत्येक खोलीत गेलं की कामं बोलवत असतात आणि स्वयंपाकघरातली कामं तर कधी संपतच नाहीत. नैसर्गिक स्त्रीप्रकृतीचा विचार करता स्त्रीतत्व मूळात शांत आणि रिलॅक्स प्रवृत्तीचं आहे,स्त्रीची कामं करण्याची पध्दत आक्रमकपणे फडशा पाडण्याची नसून आनंद घेत निर्मिती करण्याची आहे,पण आजची जीवनशैली आणि घराघरात स्त्रीचा वस्तूसारखा वापर झाल्यामुळे ती सतत अस्वस्थ धावताना दिसते,आतला न्यूनगंड भरुन काढण्यासाठी घरातल्यांना देत रहाते,स्वतःलाच शिक्षा केल्यासारखी कामात बूडून रहाते,स्वतःवरचं कमी झालेलं प्रेम तिला आणखी दु:ख देतं आणि त्या वेदनांपासून त्या भावनांपासून पळण्यासाठी ती आणखी कामं करत बसते. शांत बसलं की माणसाच्या मनातल्या भावनांच...