Posts

Showing posts with the label miri

आयुष मंत्रालयाने सांगितलेला आयुर्वेदिक काढा

आयुष मंत्रालयाने सांगितलेला आयुर्वेदिक काढा डॉ सौ अनघा कुलकर्णी डॉ एकनाथ कुलकर्णी डॉ दीपक राजपुरोहित 23 मे 2020 सुंठ म्हणजे वाळलेले आले कफ, वायूच्या सर्व विकारात तसेच हृदय विकाराच्या रुग्णांसाठी सुंठ उपयोगी आहे. सुंठ पाचक, रोचक, किंचित चवीला तिखट असून लघु, स्निग्ध, उष्ण आहे. पचल्यावर तिचा मधुर रस होतो औषधी उपयोग   खालील लक्षणात सुंठ उपयुक्त आहे पचनाच्या तक्रारी -- भूक न लागणे,अग्निमांद्य, अजीर्ण, उलटी, मळमळ, पोट जड होणे, जेवणा नंतर पोटात दुखणे, आम्लपित्त,आव पडणे, पोट दुखून संडासला होणे,कृमी, पोटदुखी, मूळव्याध, श्वसनाच्या तक्रारी सर्दी, खोकला, दमा, ताप, छाती भरणे, दम भरणे, जुनाट खोकला, नाक चोंदणे, डोकेदुखी, सायनस, अर्धशिशी, कफ पातळ होतो सांधेदुखी, आमवात, सूज, कंबर दुखी, पाठ दुखी,  वेदनाशामक स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी, अनियमित मासिक स्त्राव, पोट दुखी व कंबर दुखी, लघवीच्या तक्रारी सुंठ उष्ण असल्याने अतिप्रमाणात घेऊ नये गर्भिणी, high ब्लडप्रेशर, अल्सर etc कैयदेवनिघण्टु - १. ओषधिवर्ग शुण्ठी शुण्ठी महौषधं विश्वमौषधं विश्वभेषजम् | नागरं कटुभद्रञ्च राहुच्छत्रं कटूत्कटम् ||११५१|| ...