Posts

आठवणी तुम्हाला कमजोर बनवतात का, negative thoughts

1 आठवणी आनंद देतात की दुःख 2 आठवणी मुळे डिप्रेशन येते का नैराश्य 3 मित्रपरिवार असूनही एकटे का वाटते 4 वाचन, छंद यामध्ये मन रमत नाही का 5 इतके सर्व सुख समृध्दी असूनही एकटेपणाची खंत का 6 या ठिकाणी स्त्री असती तर ती एवढीच हळवी असती का 7 स्त्रीया जास्त हळव्या की पुरुष 8 पूर्वीसारखेच जीवन पुन्हा जगावे असे का वाटते 9 अध्यात्माकडे मन ओढ घेत नाही का 10 जीवनातील आनंदाच्या कल्पना वयानुसार बदलत नाही का 11 आयुष्यात सर्व उत्कृष्ट मिळाल्यावर समाधान वाटत नाही का 12 spiritual चा अभ्यास करावासा वाटत नाही का महत्वाचे जोडीदार , companion शोधण्याच्या नादात फसवणूक होऊ शकते आज कालच्या जगात, हे कळूनही risk का घ्यावीशी वाटते Live in मध्ये व्यक्ती म्हातारपणी, आजारपणात साथ देईल का, पुन्हा एकदा लग्नाची खरंच गरज असते का, मैत्रीण पेक्षा मित्र चांगला जोडीदार होऊ शकत नाही का म्हणजे opposite gender पेक्षा same gender, समाजात active, energetic , intelligent व्यक्ती ना करण्यासारखे खूप आहे, त्यात मन रमू शकते ना, iskon सारखा एखादा group join केल्यास जीवन बदलू शकते,  Past मधील आठवणींनी व्याकुळ होण्यापेक्षा देवाने इतरा...

सासू सून भांडणे होऊ नयेत यासाठी काय करावे

सासू सासरे v मुलगा सून यांनी एकत्र राहूच नका १मुलीचे स्वप्न असते स्वतःचे घर .भातुकली २मुली कपडे छोटे वापरतात ३म्हातारी माणसे, घोरणे, आजार, बाथरूम त्यामुळे नवरा बायको सुद्धा space हवी, बायको टीव्ही बघते, फोन वर गप्पा मारते, नवरा झोपतो, वाचतो, स्वभाव बदल आणि no adjustments now ४ तरुण मुलांना enjoy करणे हिंडणे, बाहेर खाणे आवडते, म्हाताऱ्याने त्यात interest नसतो ५घर लहान पडते ६पसारा ७लहान मुलांना थोड्या वेळा साठी सांभाळणे सोपे आहे पण दिवसभर नाही ८मुलांना ac पाहिजे तर mhataryana थंडी वाजते सर्वजण एका खोलीत झोपू शकत नाहीत, energy bills वाढतात ९नातेवाईक issue सुनेला सासूचे नातेवाईक प्रिय वाटत नाहीत १०सुनेचे आईवडील येवून राहू शकत नाहीत त्यामुळे सून सासरच्या माणसांचे प्रेमाने करत नाही ११सुनेची lifestyle वेगळी, तिला मुलांचे वाढ दिवस, एन्जॉय करायचे असते तिच्या पद्धतीने, सासूला ते आवडत नाही, गप्पा वेगळ्या, विषय वेगळे १२सासू एकटी आहे म्हणून एकत्र राहतात, मग सुनेची आई एकटी झाल्यावर आली तर चालेल का १३खाणे पदार्थ वेगवेगळे,प्रत्येकाची आवड वेगळी, कामवाली प्रॉब्लेम सासू सून यांनी वेगळे रहावे...का... Solu...

बदला, सूड घेणे

 Revenge बदला Writer Dr Mrs Anagha Kulkarni बदला घेईपर्यंत चैन पडत नाही त्यामुळे त्रास तुम्हालाच सतत ही भावना स्वतः लाच शिक्षा देत असतो एकमेकांना सतत त्रास देण्याची क्रिया काय करावे माफ करावे क्षमा ने स्वतः ला शांती मिळते क्षमा करणे सोपे नाही कारण आपण समोरच्या व्यक्तीला दोषी ठरवत रहातो आणि आपण स्वतः अस्वस्थ रहातो आपण वेदना दुःख यासाठी दुसऱ्याला दोष देतो व त्रास करून घेतो या ऐवजी मन बदला आणि हे कर्माचे फळ आहे असे समजा कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावेच लागते कर्म चांगले करा, फळ चांगले मिळेल आपली निंदा, अपमान आपण सहन करू शकत नाही त्यामुळे प्रतिकार, बदला या भावना येतात दुसऱ्याचे मन व मत आपण बदलू शकत नाही स्वतःचे मतपरिवर्तन व मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा राग आल्यावर रागराग करण्यापेक्षा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा एखाद्या कडून अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंग नक्कीच त्यासाठी स्वतः वर विश्वास ठेवा, धीर धरा , परिस्थिती बदलण्याची वाट बघण्यासाठी संयम व धीर  याची गरज आहे संकट हीच परीक्षा आहे, ज्याला आपण सत्त्वपरीक्षा म्हणतो परीक्षा चालू असताना गुरू मार्गदर्शन करत नाही आणि सोबती साथ देत नाह...

best green tea in summer

Green tea in summer Dr Mrs Anagha Kulkarni उन्हाळ्यात सरबत , कोल्ड ड्रिंक नको चहा घ्या Cold ने सर्दी होऊ शकते, घसा खवखवु शकतो, भूक कमी होते म्हणून ग्रीन tea चहा पावडर दालचिनी सुंठ थोडी वेलची लिंबू पाने पेरू पाने आंबा पाने घाम येतो  detox बॉडी पाणी भरपूर प्या

सुविचार मराठी,happy thoughts, positivity,14 august 2020,Motivational talk in marathi,health novel

सुविचार मराठी,happy thoughts, positivity, 14 august 2020,health novel, डॉ सौ अनघा कुलकर्णी ,Motivational talk in marathi मला कधीच वाटत नाही मला सारं सुख मिळावं फक्त दुःखाने माझ्या आनंदाला  कधी ना गिळाव, मला कधीच वाटत नाही  सर्वांनी मला योग्य समजावं पण  गैरसमज करून मला चुकीचं  न ठरवावं मला असे वाटत नाही की मी नेहेमीच योग्य असेन पण दिखावा करून अप्रामाणिक नक्कीच नसेन मला असं वाटत नाही की सर्वांनी नेहेमी मला साथ द्यावी पण स्वार्थासाठी नाती न तोडावी

हिंदी सुविचार,मेरे मन की बात, 13 august 2020,happy thoughts, positivity,

हिंदी सुविचार,मेरे मन की बात,  13 august 2020, happy thoughts, positivity, डॉ सौ अनघा कुलकर्णी हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की कृष्ण जन्माष्टमी की शुभ कामनाए  एक बात सीखी है  रंगोली के रंगो से  अगर निखरना है,  तो बिखरना जरूरी है दिलो मे वही बसते है, जिनका मन साफ हो, क्योकि सुई मे वही धागा प्रवेश कर सकता है, जिस धागे मे कोई गाठ ना हो । आप नहीं जानते कि क़िस रूप में आपको आशीर्वाद मिलेगा। इसलिए आपको खुद को खुला रखना चाहिए और जीवन के हर पहलू को एक आशीर्वाद के रूप में लेना चाहिए। जिंदगी हमे खूबसुरत दोस्त देती है, और अच्छे दोस्त हमे खूबसुरत जिंदगी देते है ।

मराठी सुविचार, happy thoughts, positivity,12 august 2020,

Image
मराठी सुविचार, happy thoughts, positivity, 12 august 2020, डॉ सौ अनघा कुलकर्णी आनंद हा चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावताना आपलीही बोटे सुगंधित करून जातो. अशी व्यक्ती शोधू नका की, जी तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल, अशी व्यक्ती शोधा की, जी तुम्हांला कितीही अडचणी असताना एकट सोडणार नाही. झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहीत असते, फरक एवढाच आहे, की झरे तळ्यांच्या साठवणीत वाहतात, आणि डोळे कुणाच्या तरी आठवणीत वाहतात आयुष्य जगतांना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढी साठी सुध्दा ऊन आणि पाऊस दोन्हींची गरज असते.

गोकुळ अष्टमी, shrikrishna janmashtami,shrikrishna palana

Image
 गोकुळ अष्टमी, shrikrishna janmashtami, जन्मला कान्हा.. Shrikrishna palana जन्मला कान्हा गोकुळी तान्हा गोपिका फुटे आनंद पान्हा...अवनी अवतरला जगताचा राणा जो बाळा जो रे जो चोरूनी खाई ओरडे माई लोण्याचा गोळा पळवे बाई...अवतरला अवनीवर राखण्या गायी जो बाळा जो रे जो मित्रांशी गट्टी करतो बट्टी खट्याळ कृष्णा भारी हो हट्टी...अवतरला अवनीवर करण्या दैत्यांची सुट्टी जो बाळा जो रे जो लाडका भारी कृष्ण मुरारी मुखी दावली दुनिया सारी...अवतरला अवनीवर जगतासी तारी जो बाळा जो रे जो पाहूनी काया गोपिका माया राधा लागली पहा जळाया...अवतरला अवनीवर प्रेम शिकवाया जो बाळा जो रे जो मित्र सुदामा गोकुळधामा... आला भेटाया या निजधामा...अवतरला अवनीवर मैत्र जमवाया जो बाळा जो रे जो पोह्याची भेट हृदयी थेट कृष्णा आवडी  सप्रेम भेट...अवतरला अवनीवर स्वर्गातूनी थेट जो बाळा जो रे जो कृष्ण हा साधा  भाळली राधा  दोघांना झाली  प्रेमाची बाधा...अवतरला अवनीवर सांगण्या भगवद्गीता जो बाळा जो रे जो सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे ,डॉ सौ अनघा कुलकर्णी

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

ओवाळू आरती तुजला श्रीकृष्ण प्रेम दे मजला।। तुझी अगाध अनुपम लीला विख्यात असे जगताला वर्णीता शेष ही श्रमला नीती नीतीची म्हणती तुजला श्रीकृष्ण प्रेम दे मजला।।1।। जरी असशी निर्गुण थोर तुझा युगे युगे अवतार घेतोसी परात्पर जिवा लागी त्रासिशी तुजला।।2।। तू द्वादश अग्नी गिळीला बोटावर गोवर्धन उचलला कंस chanur ठार ची केला ब्रह्मदीक शरण हो तुजला।।3।। भारतीय महा युद्धाला प्रवृत्त केले पार्थाला बोधूनी भगवद्गीता ला प्रेम दास वंदितो तुजला।।4।।

अयोध्येत राम अवतरले

Image
सजवा हे घर फुला फुलाने की अयोध्येत श्रीराम अवतरले। झोपडी ही भासे स्वर्ग जणू की अयोध्येत श्रीराम अवतरले।।धृ।। स्वर रचना --डॉ सौ अनघा कुलकर्णी पद कमळावर अभिषेक घडो नयनातुनी गंगा वाहे पायघड्या घालते मम तनुच्या की अयोध्येत राम अवतरले।।1।। तुझ्या चाहुलीने मी मोहरते मनी हे धैर्य दाटते संकटांशी सामना मी करते तुझ्या येण्याने जीवन तरते माझी प्रार्थना तू ऐकोनि अयोध्येत श्रीराम अवतरले।।2।।

श्रावण महिन्यात पार्वती जपाला बसली,हरितालिकेची आरती,श्रावण सोमवार आरती,

श्रावण महिन्यात पार्वती जपाला बसली, जपाला बसली, मग्न ध्यानात जाहली।।धृ।। स्वर रचना -डॉ सौ अनघा कुलकर्णी पहिल्या सोमवारी बेल हा तीन पानाचा, तीन पानाचा, माझ्या शंभुला वाहायचस।।1।। दुसऱ्या सोमवारी विभूती कपाळी लावायची, कपाळी लावायची माझ्या शंभुला वाहायची।।3।। तिसऱ्या सोमवारी पांढरे पुष्प शंभुला वाहायचे, शंभुला वाहायचे, डोळे भरून पहायचे।।4।। चवथ्या सोमवारी शिवामूठ वाहायची, शिवामूठ वाहायची माझ्या शंभुला वाहायची।।5।। पाचव्या सोमवारी आरती नैवेद्य करायचा, डमरू वाजवायचा,नैवेद्य फलहाराचा।।6।। हरितालिकेला अर्चना उपवास करायचे,तन मन हरपून ध्यान धारणा मग्न व्हायचे।।7।। शिवभक्ती ही न्यारी,असे शंभुला प्यारी शिव दर्शन, आशीर्वाद घेण्या रमती या नारी।।8।।

अवध मे राम आए है लैरीकस

Image
सजा दो घर को गुलशन सा अवध मे राम आये है अवध मे राम आये है मेरे सरकार आये है लगे कुटिया भी दुलहन सी अवध मे राम आये है सजा दो घर को गुलशन सा अवध मे राम आये है।।धृ।। पखारो इनके चरणो को बहा कर प्रेम की गंगा2 बिछा दो अपनी पलको को2 अवध मे राम आये है।।1।। 'तेरी आहट से है वाकिफ नही चेहेरे की है दरकार बिना देखे ही कह देंगे लो आ गए है मेरे सरकार दुआ ओ का हुआ है असर अवध मे।   ।।2।।

संकष्टी भजन,श्री गजानन महाराज प्रार्थना

गजानना धावुनी ये, दुःख आमचे जाणून घे सापडलो संकटात आम्ही तूच आता तारून ने स्वर रचना व गायन -- डॉ सौ अनघा कुलकर्णी गजानना धावुनी ये, दुःख आमचे जाणून घे सापडलो संकटात आम्ही तूच आता तारून ने।।धृ।। तुजविण नाही देवा कोण आम्हा वाली तूच माय बाप आमचा तूच रे कैवारी गजानना धावून ये।।1।। दिनदुबल्या ना देवा सदा तूच तारी  तुझ्या मायममतेची देऊनी शिदोरी।।2।। कोरोना ची भीती देवा सांग कसा जगू काम नाही धंदा नाही घर कसे चालवू।।3।। धन्य धन्य गजानना किती महिमा गाऊ बळ दे आशिष दे कितीवेळा सांगू।।4।।

तूच माझे जीवन, तू जीवनदाता,सावर रे कृष्णा सावर रे कान्हा,श्रीकृष्ण भजन

Image
तूच माझे जीवन, तू जीवनदाता सावर रे कृष्णा सावर रे कान्हा स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी तूच माझे जीवन, तू जीवनदाता सावर रे कृष्णा सावर रे कान्हा डुबत आहे रे जीवन नौका सावर रे कृष्णा सावर रे कान्हा।। कसे दुःख सांगू, कसे मी लपवू डोळ्यातील गंगा देवा  कशी मी थांबवू वादळ हे सुटले ,जग बुडू लागले कृष्णा सावर रे कान्हा सावर रे।।1।। आधार ही सुटला देवा,  किनारा ही दूर गेला थांबतो हा श्वास माझा समीप हा काळ आला कुठे गेला मुरलीवाला जीव माझा भेंडाळला सावर रे कृष्णा, सावर रे कान्हा।।2।। देवा तूच आसपास,  हाच माझा विश्वास माझा जीव तुझा श्वास माझा प्राण तुझा खास केशवा माधवा मदन गोपाळा हरी नारायणा मन मोहना।।3।।

उपमा, उप्पीट,मऊ व हलके होण्यासाठी,उप्पीट गाठी होऊ नयेत म्हणून काय करावे

उपमा, उप्पीट,मऊ व हलके होण्यासाठी,उप्पीट गाठी होऊ नयेत म्हणून काय करावे Dr Mrs Anagha Kulkarni 1 तुपावर रवा भाजणे 2 फोडणीत तेल जास्त वापरणे 3 पाणी वेगळ्या भांड्यात उकळून घेणे 4फोडणीत रवा मिक्स करणे व लगेच वरून उकळलेले पाणी घालणे 5 मिश्रण एका दिशेने गोल फिरवणे

what is YouTube space, YouTube space locations

Image
what is YouTube space, YouTube space locations YouTube Space is a physical location made by YouTube for content creators, that is present in a few cities around the world, including Los Angeles and London. It is used by content creators to learn about producing content as well as providing them with facilities to create content for their YouTube channels.YouTube Space is completely free to use and YouTube provides equipment, studio space, post production facilities and trainings and workshops. There are currently ten YouTube Spaces around the world. 1 London YouTube's first space was opened in London Kings Cross in 2012.  2 Los Angeles LA was the second location to have a YouTube space and opened up in 2013.  3 Tokyo Tokyo's YouTube space opened in 2013.  4 New York New York's YouTube space opened up in 2014,  5 São Paulo Brazil's first YouTube space opened in 2014. 6 Rio de Janeiro Brazil's second YouTube space opened in 2015.  7 B...

गौरी गीते, गौरीची गाणी, गौरी गणपती गीत, गौर माझी सजली

Image
गौरी गीते, गौरीची गाणी, गौरी गणपती गीत, रचना डॉ सौ अनघा कुलकर्णी फुलांची झाली उधळण रंगांची झाली उधळण की गौर माझी सजली सुगंधाची झाली उधळण की गौर माझी सजली।।धृ।। चाफा, झेंडू, केवडा,शेवंती जास्वंद ,निशिगंध,जुई,चमेली केवडा, कण्हेर, गुलाब की गौर माझी सजली सुगंधाची झाली उधळण।।1।। पिवळा रंग उधळला हिरव्या पत्री जमवल्या रंगीत गुलबक्षी की निसर्ग मोहरला।।2।। शंकर आले, पार्वती आली कार्तिक, गणपती ची स्वारी खुलली नंदी मूषक जोडी ही आली की सर्प मोर नाचती।।3।। सुख आले, आनंद आला, शांती सोबत समाधान आले गौर माझी माहेरा आली नाती सोभाग्यासह  खुलली।।4।।

श्री गणेश भजन,तुरु तुरु चाले उंदीर, गणपती गाणी,गणपती बाप्पा मोरया

Image
तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजनाच्या आरंभी मोरया आले।।धृ।। मोरयाचा अंगाला चंदनाची उटी पिवळा पितांबर शोभटसे कटी सोंडेखाली त्याच्या तूनदिल हाले।।1।। सुपसारखे कान बाई  चंदनाचा टिळा पायात चाळ गळा  मोतीयाच्या माळा एकच दंत त्याला तोही त्याला खुले।।2।। अर्धांगी शोभतसे शारदा सखी पुस्तक वीणा घेऊनिया हाती उभयता पाहुनी मन रंगुनी गेले।।3।। मस्तकी मुगुट आणि दूर्वा ची जुडी भक्तांच्या संकटी घालतसे उडी भक्त म्हणे आज माझे भान हरपले।।4।।

जिवती पूजन व आरती,श्रावण शुक्रवार पूजा

Image
जयदेवी जयदेवी  जय जिवती जननी  सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥ श्रावण शुक्रवारी आणूं प्रतिमा  घरात स्थापूनी करु पूजना  आघाडा दूर्वा माळा वाहूं या  अक्षता वाहूनी कहाणी सांगू या  1 पुरणपोळीचा नैवेद् करू  सुवासिनींना भोजन घालू  चणे हळद कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ 2 सटवीची बाधा होतसे बाळांना  सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना  यासाठी तुजला करिती प्रार्थना  पूर्ण ही करी मनोकामना 3 #आपली संस्कृती व शास्त्र. #जिवती ,नाग नरसोबा व बुधबृहस्पती माहिती.. #जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ   मानवाला अनादी काळापासून घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे. या आदराचं रूपांतर त्या अनाकलनीय गूढाचा सत्कार व पूजन करण्यात झालं. यातूनच ते गूढ पिढ्यांपिढ्या पुजल्या जाऊ लागलं . असाच एक गूढ दार पिढ्यांनी पुजलं ते 'जिवती पूजन' या रूपात.  कोण ही जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? जिवती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? हे  आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा ल...

मंगळागौर आरती|श्रावण मंगळवार आरती lyrics

मंगळागौर आरती|श्रावण मंगळवार आरती lyrics डॉ सौ अनघा कुलकर्णी मागू शाश्वत सौभाग्य मंगळागौरीला करूया पंचारती तिजला || श्रावण मंगळवारी तीला नेसवू भरजरी पैठणी सजण्या कंचुकी मौक्तिक घालू घालू कंचुकी मौक्तिक घालू ।।1।। पंचामृती ते पूजन करू कुंकूम अबीर शेंदूर बुक्का वाहू अक्षता वाहू वाहू वाहू अक्षता वाहू।।2।। नेत्री अंजन घालू आधी कंठी आभूषण हाती कंकण नासिकी नथ ती घालू घालू नासिकी नथ ती घालू ।।3।। सोळा तऱ्हेच्या पत्री आणूया षोडशोपचारे पूजा करूया  खाजा जिलब्या करंज्या ताज्या  नैवेद्या प्रति वाढू लाडू बासुंदी बुंदी ही वाढू ।।4।। जन्मांतरीचे दुःख हरण्या जाऊ शरण दृढ धरू चरणा संसारी सुख हे मागू मागू  चित्ती समाधान मागू।।5।। मागू शाश्वत सौभाग्य मंगळागौरीला करूया पंचारती तिजला