संकष्टी भजन,श्री गजानन महाराज प्रार्थना
गजानना धावुनी ये, दुःख आमचे जाणून घे
सापडलो संकटात आम्ही तूच आता तारून ने
स्वर रचना व गायन -- डॉ सौ अनघा कुलकर्णी
गजानना धावुनी ये, दुःख आमचे जाणून घे
सापडलो संकटात आम्ही तूच आता तारून ने।।धृ।।
तुजविण नाही देवा कोण आम्हा वाली
तूच माय बाप आमचा तूच रे कैवारी
गजानना धावून ये।।1।।
दिनदुबल्या ना देवा सदा तूच तारी
तुझ्या मायममतेची देऊनी शिदोरी।।2।।
कोरोना ची भीती देवा सांग कसा जगू
काम नाही धंदा नाही घर कसे चालवू।।3।।
धन्य धन्य गजानना किती महिमा गाऊ
बळ दे आशिष दे कितीवेळा सांगू।।4।।
Comments
Post a Comment