गौरी गीते, गौरीची गाणी, गौरी गणपती गीत, गौर माझी सजली
गौरी गीते, गौरीची गाणी, गौरी गणपती गीत,
रचना
डॉ सौ अनघा कुलकर्णी
फुलांची झाली उधळण
रंगांची झाली उधळण
की गौर माझी सजली
सुगंधाची झाली उधळण
की गौर माझी सजली।।धृ।।
चाफा, झेंडू, केवडा,शेवंती
जास्वंद ,निशिगंध,जुई,चमेली
केवडा, कण्हेर, गुलाब
की गौर माझी सजली
सुगंधाची झाली उधळण।।1।।
पिवळा रंग उधळला
हिरव्या पत्री जमवल्या
रंगीत गुलबक्षी
की निसर्ग मोहरला।।2।।
शंकर आले, पार्वती आली
कार्तिक, गणपती ची स्वारी खुलली
नंदी मूषक जोडी ही आली
की सर्प मोर नाचती।।3।।
सुख आले, आनंद आला,
शांती सोबत समाधान आले
गौर माझी माहेरा आली
नाती सोभाग्यासह खुलली।।4।।
Comments
Post a Comment