तूच माझे जीवन, तू जीवनदाता,सावर रे कृष्णा सावर रे कान्हा,श्रीकृष्ण भजन
तूच माझे जीवन, तू जीवनदाता
सावर रे कृष्णा सावर रे कान्हा
स्वर रचना व गायन
डॉ सौ अनघा कुलकर्णी
तूच माझे जीवन, तू जीवनदाता
सावर रे कृष्णा सावर रे कान्हा
डुबत आहे रे जीवन नौका
सावर रे कृष्णा सावर रे कान्हा।।
कसे दुःख सांगू, कसे मी लपवू
डोळ्यातील गंगा देवा
कशी मी थांबवू
वादळ हे सुटले ,जग बुडू लागले
कृष्णा सावर रे कान्हा सावर रे।।1।।
आधार ही सुटला देवा,
किनारा ही दूर गेला
थांबतो हा श्वास माझा
समीप हा काळ आला
कुठे गेला मुरलीवाला
जीव माझा भेंडाळला
सावर रे कृष्णा, सावर रे कान्हा।।2।।
देवा तूच आसपास,
हाच माझा विश्वास
माझा जीव तुझा श्वास
माझा प्राण तुझा खास
केशवा माधवा
मदन गोपाळा
हरी नारायणा
मन मोहना।।3।।
Comments
Post a Comment