श्रावण महिन्यात पार्वती जपाला बसली,हरितालिकेची आरती,श्रावण सोमवार आरती,
श्रावण महिन्यात पार्वती जपाला बसली, जपाला बसली,
मग्न ध्यानात जाहली।।धृ।।
स्वर रचना -डॉ सौ अनघा कुलकर्णी
पहिल्या सोमवारी बेल हा तीन पानाचा, तीन पानाचा, माझ्या
शंभुला वाहायचस।।1।।
दुसऱ्या सोमवारी विभूती कपाळी लावायची, कपाळी लावायची माझ्या शंभुला वाहायची।।3।।
तिसऱ्या सोमवारी पांढरे पुष्प
शंभुला वाहायचे, शंभुला वाहायचे,
डोळे भरून पहायचे।।4।।
चवथ्या सोमवारी शिवामूठ वाहायची, शिवामूठ वाहायची
माझ्या शंभुला वाहायची।।5।।
पाचव्या सोमवारी आरती नैवेद्य करायचा, डमरू वाजवायचा,नैवेद्य फलहाराचा।।6।।
हरितालिकेला अर्चना उपवास करायचे,तन मन हरपून ध्यान धारणा मग्न व्हायचे।।7।।
शिवभक्ती ही न्यारी,असे शंभुला प्यारी
शिव दर्शन, आशीर्वाद घेण्या
रमती या नारी।।8।।
Comments
Post a Comment