बदला, सूड घेणे

 Revenge बदला

Writer
Dr Mrs Anagha Kulkarni

बदला घेईपर्यंत चैन पडत नाही
त्यामुळे त्रास तुम्हालाच सतत
ही भावना स्वतः लाच शिक्षा देत असतो
एकमेकांना सतत त्रास देण्याची क्रिया
काय करावे माफ करावे

क्षमा ने स्वतः ला शांती मिळते
क्षमा करणे सोपे नाही कारण आपण समोरच्या व्यक्तीला दोषी ठरवत रहातो
आणि आपण स्वतः अस्वस्थ रहातो
आपण वेदना दुःख यासाठी दुसऱ्याला दोष देतो व त्रास करून घेतो
या ऐवजी मन बदला आणि हे कर्माचे फळ आहे असे समजा
कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावेच लागते
कर्म चांगले करा, फळ चांगले मिळेल
आपली निंदा, अपमान आपण सहन करू शकत नाही त्यामुळे प्रतिकार, बदला या भावना येतात
दुसऱ्याचे मन व मत आपण बदलू शकत नाही
स्वतःचे मतपरिवर्तन व मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा
राग आल्यावर रागराग करण्यापेक्षा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा
एखाद्या कडून अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंग नक्कीच
त्यासाठी स्वतः वर विश्वास ठेवा, धीर धरा , परिस्थिती बदलण्याची वाट बघण्यासाठी संयम व धीर  याची गरज आहे
संकट हीच परीक्षा आहे, ज्याला आपण सत्त्वपरीक्षा म्हणतो
परीक्षा चालू असताना गुरू मार्गदर्शन करत नाही आणि सोबती साथ देत नाही
परीक्षा आपल्यालाच द्यायची असते यासाठी धीर , संयम, मन शांत ठेवणे गरजेचे असते
द्विधा मनस्थिती काय कामाची
त्यावेळी अनुभव व बुद्धी च्या आधारे सफल होणे जास्त महत्त्वाचे
जसजसे वय वाढेल तसतसे आपल्याला लक्षात येते की नको त्या व्यक्ती ना व गोष्टींना   महत्व देऊन आपण वेळ,energy, वाया घालवली

कितीही संकटे आली तरी tension , त्रास तणावग्रस्त होऊ नका, कारण परिस्थिती, दिवस सतत बदलत असतात, तेच कायम कधीच रहात नाही
आपण संकटात अडचणीत स्वतः वर विश्वास ठेवून आत्मबल सहनशीलता वाढवली पाहिजे

अशांत मनात कधीच चांगले सकारात्मक विचार येत नाहीत
शांत व स्थिर मन असेल तर अडचणीत मार्ग दिसतो सापडतो
जे होणार आहे ते होणारच यावर विश्वास ठेवा
परंतु प्रयत्न थांबवू नका, आजचा प्रत्येक दिवस योग्य कर्म व योग्य विचार करण्यात घालवा
भूतकाळ सारखा आठवल्याने मन दुःखी होईल , कष्टी होईल
तुमचा वर्तमान चांगला असेल, तर भविष्यत ही नक्कीच चांगलं घडेल
यासाठी नशिबाला दोष देऊ नका, नशिबात असेल ते घडेल असे समजून निष्क्रिय राहू नका, 
मन शांत ठेवून अहंकार क्रोध बाजूला सारून प्रयत्न करत रहा

सुख शांती समाधान नक्की मिळेल
Revenge बदला या भावना क्षणिक आहेत ते तण आहे वेळीच काढून टाका

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics