मंगळागौर आरती|श्रावण मंगळवार आरती lyrics
मंगळागौर आरती|श्रावण मंगळवार आरती lyrics
डॉ सौ अनघा कुलकर्णी
मागू शाश्वत सौभाग्य मंगळागौरीला
करूया पंचारती तिजला ||
श्रावण मंगळवारी तीला
नेसवू भरजरी पैठणी सजण्या
कंचुकी मौक्तिक घालू घालू
कंचुकी मौक्तिक घालू ।।1।।
पंचामृती ते पूजन करू
कुंकूम अबीर शेंदूर बुक्का
वाहू अक्षता वाहू वाहू
वाहू अक्षता वाहू।।2।।
नेत्री अंजन घालू आधी
कंठी आभूषण हाती कंकण
नासिकी नथ ती घालू घालू
नासिकी नथ ती घालू ।।3।।
सोळा तऱ्हेच्या पत्री आणूया
षोडशोपचारे पूजा करूया
खाजा जिलब्या करंज्या ताज्या
नैवेद्या प्रति वाढू लाडू
बासुंदी बुंदी ही वाढू ।।4।।
जन्मांतरीचे दुःख हरण्या
जाऊ शरण
दृढ धरू चरणा
संसारी सुख हे मागू मागू
चित्ती समाधान मागू।।5।।
मागू शाश्वत सौभाग्य मंगळागौरीला
करूया पंचारती तिजला
Comments
Post a Comment