गोकुळ अष्टमी, shrikrishna janmashtami,shrikrishna palana
गोकुळ अष्टमी, shrikrishna janmashtami,
जन्मला कान्हा.. Shrikrishna palana
जन्मला कान्हा
गोकुळी तान्हा
गोपिका फुटे
आनंद पान्हा...अवनी अवतरला जगताचा राणा जो बाळा जो रे जो
चोरूनी खाई
ओरडे माई
लोण्याचा गोळा
पळवे बाई...अवतरला अवनीवर राखण्या गायी जो बाळा जो रे जो
मित्रांशी गट्टी
करतो बट्टी
खट्याळ कृष्णा
भारी हो हट्टी...अवतरला अवनीवर करण्या दैत्यांची सुट्टी जो बाळा जो रे जो
लाडका भारी
कृष्ण मुरारी
मुखी दावली
दुनिया सारी...अवतरला अवनीवर जगतासी तारी जो बाळा जो रे जो
पाहूनी काया
गोपिका माया
राधा लागली
पहा जळाया...अवतरला अवनीवर प्रेम शिकवाया जो बाळा जो रे जो
मित्र सुदामा
गोकुळधामा...
आला भेटाया
या निजधामा...अवतरला अवनीवर मैत्र जमवाया जो बाळा जो रे जो
पोह्याची भेट
हृदयी थेट
कृष्णा आवडी
सप्रेम भेट...अवतरला अवनीवर स्वर्गातूनी थेट जो बाळा जो रे जो
कृष्ण हा साधा
भाळली राधा
दोघांना झाली
प्रेमाची बाधा...अवतरला अवनीवर सांगण्या भगवद्गीता जो बाळा जो रे जो
सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे ,डॉ सौ अनघा कुलकर्णी
Comments
Post a Comment