श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला
ओवाळू आरती तुजला
श्रीकृष्ण प्रेम दे मजला।।
तुझी अगाध अनुपम लीला
विख्यात असे जगताला
वर्णीता शेष ही श्रमला
नीती नीतीची म्हणती तुजला
श्रीकृष्ण प्रेम दे मजला।।1।।
जरी असशी निर्गुण थोर
तुझा युगे युगे अवतार
घेतोसी परात्पर
जिवा लागी त्रासिशी तुजला।।2।।
तू द्वादश अग्नी गिळीला
बोटावर गोवर्धन उचलला
कंस chanur ठार ची केला
ब्रह्मदीक शरण हो तुजला।।3।।
भारतीय महा युद्धाला
प्रवृत्त केले पार्थाला
बोधूनी भगवद्गीता ला
प्रेम दास वंदितो तुजला।।4।।
Comments
Post a Comment