अयोध्येत राम अवतरले
सजवा हे घर फुला फुलाने
की अयोध्येत श्रीराम अवतरले।
झोपडी ही भासे स्वर्ग जणू
की अयोध्येत श्रीराम अवतरले।।धृ।।
स्वर रचना --डॉ सौ अनघा कुलकर्णी
पद कमळावर अभिषेक घडो
नयनातुनी गंगा वाहे
पायघड्या घालते मम तनुच्या
की अयोध्येत राम अवतरले।।1।।
तुझ्या चाहुलीने मी मोहरते
मनी हे धैर्य दाटते
संकटांशी सामना मी करते
तुझ्या येण्याने जीवन तरते
माझी प्रार्थना तू ऐकोनि
अयोध्येत श्रीराम अवतरले।।2।।
Comments
Post a Comment