श्री गणेश भजन,तुरु तुरु चाले उंदीर, गणपती गाणी,गणपती बाप्पा मोरया
तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले
भजनाच्या आरंभी मोरया आले।।धृ।।
मोरयाचा अंगाला चंदनाची उटी
पिवळा पितांबर शोभटसे कटी
सोंडेखाली त्याच्या तूनदिल हाले।।1।।
सुपसारखे कान बाई
चंदनाचा टिळा
पायात चाळ गळा
मोतीयाच्या माळा
एकच दंत त्याला
तोही त्याला खुले।।2।।
अर्धांगी शोभतसे शारदा सखी
पुस्तक वीणा घेऊनिया हाती
उभयता पाहुनी मन रंगुनी गेले।।3।।
मस्तकी मुगुट आणि दूर्वा ची जुडी
भक्तांच्या संकटी घालतसे उडी
भक्त म्हणे आज माझे भान हरपले।।4।।
Comments
Post a Comment