आठवणी तुम्हाला कमजोर बनवतात का, negative thoughts

1 आठवणी आनंद देतात की दुःख
2 आठवणी मुळे डिप्रेशन येते का नैराश्य
3 मित्रपरिवार असूनही एकटे का वाटते
4 वाचन, छंद यामध्ये मन रमत नाही का
5 इतके सर्व सुख समृध्दी असूनही एकटेपणाची खंत का
6 या ठिकाणी स्त्री असती तर ती एवढीच हळवी असती का
7 स्त्रीया जास्त हळव्या की पुरुष
8 पूर्वीसारखेच जीवन पुन्हा जगावे असे का वाटते
9 अध्यात्माकडे मन ओढ घेत नाही का
10 जीवनातील आनंदाच्या कल्पना वयानुसार बदलत नाही का
11 आयुष्यात सर्व उत्कृष्ट मिळाल्यावर समाधान वाटत नाही का
12 spiritual चा अभ्यास करावासा वाटत नाही का


महत्वाचे
जोडीदार , companion शोधण्याच्या नादात फसवणूक होऊ शकते आज कालच्या जगात, हे कळूनही risk का घ्यावीशी वाटते

Live in मध्ये व्यक्ती म्हातारपणी, आजारपणात साथ देईल का,
पुन्हा एकदा लग्नाची खरंच गरज असते का,
मैत्रीण पेक्षा मित्र चांगला जोडीदार होऊ शकत नाही का म्हणजे opposite gender पेक्षा same gender,
समाजात active, energetic , intelligent व्यक्ती ना करण्यासारखे खूप आहे, त्यात मन रमू शकते ना, iskon सारखा एखादा group join केल्यास जीवन बदलू शकते, 
Past मधील आठवणींनी व्याकुळ होण्यापेक्षा देवाने इतरांपेक्षा खूप जास्त दिले आहे असा विचार करणे जास्त योग्य वाटत नाही का,
एखाद्या व्यक्तीला इतरांनी हेवा करावा असे आयुष्य मिळालेले असते तर पुन्हा आणखीन काहीतरी मिळावे असे मनुष्याला का वाटते
 मनाविरुद्ध कुढत जगायचे,जीव संपवावा असे विचार असे विचार सर्व जग फिरून अनुभव घेतलेल्या हुशार व्यक्तीच्या मनांत क्षणभर सुद्धा येता कामा नयेत,
देव संकटे त्याच व्यक्तीला देतो ज्या व्यक्तीकडे ती संकटे पेलण्याची ताकत आहे, संकटांना तोंड देऊन धीराने पुन्हा उभे राहणे हे ऐऱ्यागैरयाचे काम नव्हे,
तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा घेण्यासाठी संकटे आलेली असतात, त्यात उत्तीर्ण होणार्यांनी पुढे जायचे असते, पुन्हा मागच्या इयत्तेत प्रवेश नाही घ्यायचा

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics