भक्त दारी आला अंबे lyrics, स्वरा भजनी मंडळ
भक्त दारी आला अंबे जोगवा घाला
देवीचा जोगवा
#healthnovel
डॉ सौ अनघा कुलकर्णी
भक्त दारी आला अंबे जोगवा घाला
जोगवा घाला अंबे जोगवा घाला1
माहूर देशी गमन करुनी मूळ पीठ आली
तुळजाआई उभी राहिली भक्त रक्षिण्याशी
भावतीर्थी फुले वाहिली तुझिया पूजेला
उदो उदो बोला अंबे उदो उदो बोला 2
रज तम गुण आम्ही मागे सारियले
काम क्रोध मत्सर ही जाळून टाकीयले
अहंकारी धूप आई आज जाळीला3
जगत जननी अंबाबाई पावे लवलाही
हळदकुंकू भंडाराही सांडियला पायी
सत्य वाचा वाणी माझी गाते गाण्याला4
जातो आई माघारी ग कृपा असू द्यावी
सद्गुणांची परडी भरोनी भक्तालागी देई
ज्ञानदीप भक्तीचा हा जगी उजळवी
आशीर्वाद घेण्यासाठी भक्त भुकेला5
Comments
Post a Comment