स्वरा भजनी मंडळ,swara bhajani mandal, स्वरा, bhajan with lyrics

स्वरा भजनी मंडळ हा हौशी महिला चे भजन गायन मंडळ आहे, आम्ही घरगुती साधी सोपी वाद्ये वाजवून संगीताचा आनंद घेतो, lyrics दिलेली असल्याने तुम्ही सुद्धा भजन म्हणायला शिकू शकता, भजन या संगीत कलेमुळे मन उत्साही व आनंदी रहाते, मनाची अतिविचार करण्याची सवय कमी होते, रागावर नियंत्रण येते, चिडचिड कमी होते, विनाकारण बदबडण्याची सवय कमी होते, भजन गुणगुणल्यामुळे घरातही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मनाची अस्थिरता कमी होते , झोप शांत लागते.
Health novel या युट्युब चॅनेल वर स्वरा भजनी मंडळाची शेकडो भजने आहेत, त्यातील काही स्वरचित आहेत, संतांचे अभंग आहेत, त्याचप्रमाणे काही हिंदी भजनेही आहेत
महादेव भजन
शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान

गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा
पायात नुपूर छान।।1।।

जटेतून वाहे झुळ झुळ गंगा
डोक्यावर चांदोबा छान।।2।।

शंकराच्या हातात डमरू त्रिशूल
पायात खडावा छान।।3।।

बेल पुष्पावरी महादेवाची प्रीती
कपाळाला भस्म शोभे छान।।4।।

घेऊन रुप भिल्लींण आली
कैलास नाचत छान।।5।।

डोळे उघडून शंकर पाही
पार्वती दिसते छान।।6।।

शंकराच्या मांडीवर गिरीजा गणपती
शोभून दिसती छान।।7।।

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर