अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा lyrics, स्वरा भजनी मंडळ,विठ्ठल भजन
अलीकडे ये मला पलीकडे ने
पांडुरंगा
नदी भरली चंद्रभागा ।।धृ।।
दर्शनासी व्याकुळ झालो रूप तुझे पहाया
पावन होईन तव चरणासी
पतित माझी काया 2
ऐलतीरी ये, पैलतीरी ने श्रीरंगा
नदी भरली चरणी ।।1।।
विठ्ठल विठ्ठल गजर घुमे हा
दुमदुमली पंढरी
टाळ मृदंग वाजत गाजत नाम तुझे श्रीहरी
धावून ये मला दर्शन दे जिवलगा।।3।।
नरदेही या व्यर्थ ठरलो नाही मुखी तव नाम
हरी भक्ती वीण जीवन नाही मंत्र एक हरी नाम
चरणी तू घे, मज ध्यास ही दे, पांडुरंगा ।।3।।
भजनी तुझिया रंगुनी जाईन,
निज ध्याते निज देही
संत जनाचा संग घडे मज
पापमुक्त मी होई
भक्ती ही दे, मज मुक्ती ही दे
निःसंगा।।4।।
Comments
Post a Comment