शनिदेवाची आरती

शनिदेवाची आरती

जय जय श्रीशनिदेवा ॥
श्री पद्मकर शिरीं ठेवा ॥
आरती ओवाळीतों ॥
मनोभावें करूनी सेवा ॥ ध्रु०॥

सूर्यसूता शनिमूर्ती ॥
तुझी अगाध कीर्ती ॥
एकमुखें काय वर्णूं ॥
शेषा न चले स्फूर्ती ॥ जय० ॥ १ ॥

नवग्रहांमाजी श्रेष्ठा ॥
पराक्रम थोर तुझा ॥
ज्यावरी तूं कृपा करिसी ॥
होय रंकाचा राजा ॥ जय० ॥ २ ॥

विक्रमासारिखा हो ॥
शतकर्ता पुण्यराशी ॥
गर्व धरितां शिक्षा केली ॥
बहु छळियेलें त्यासी ॥ जय० ॥ ३ ॥

शंकराच्या वरदानेम ॥
गर्व रावणें केला ॥
साडेसाती येतां त्यासी ॥
समूळ नाशासी नेला ॥ जय० ॥ ४ ॥

प्रत्यक्ष गुरूनाथा चमत्कार दावियेला ॥
नेउनी शूळापाशीं ॥
पुन्हां सन्मान केला ॥ जय० ॥ ५ ॥

ऎसे गुण किती गाऊं ॥
धणी न पुरे गातां ॥
कृपा करीं दिनावरी ॥
महाराजा समर्था ॥ जय० ॥ ६ ॥

दोन्ही कर जोडोनियां ॥
रखमा लीन सदा पायीं ॥
प्रसाद हाचि मागे ॥
उदयकाळ सौख्य दावीं ॥ जय० ॥ ७ ॥

Comments

Popular posts from this blog

अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा lyrics, स्वरा भजनी मंडळ,विठ्ठल भजन

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना lyrics