कोरोना विषाणू चे संकटावर मात करण्यासाठी देवीची आराधना, प्रार्थना

कोरोना विषाणू चे संकटावर मात करण्यासाठी देवी चा धावा, देवी ची प्रार्थना

रचना डॉ सौ अनघा कुलकर्णी

हे अंबे पृथ्वीवर धावुनी ये ग
पैठणी जरीकाठी सावरीत ये ग
चंदेरी काठ त्याचा आवरीत ये ग ||1||
त्रिशूल भाला घेऊनी ये ग
कोरोनावर लस घेऊनी ये ग
आरोग्याचा आशीर्वाद घेऊन ये ग||2||
लावून तुजला कुंकूम भाळी
नेसविन भरजरी साडी चोळी
सर्दी खोकल्याचे औषध घेऊन ये ग
आरोग्याची जडी बुटी घेऊन ये ग ||3||
वाहीन तुजला हार तुरे ग
जाई जुई चाफा चमेली गुलाब
डॉ ना पोलिसांना बळ तू दे ग
प्रधानमंत्रीना मुख्यमंत्री ना आशिष दे ग||4||

गाईन मंजुळ गीत तुझे ग
दिव्यांची रोषणाई, टाळ्यांचा गजर पाहून घे ग
ठेक्यावरती ताल तुझा घुमवित ये ग
जनसंपर्क टाळण्याची सर्वाना बुद्धी तू दे ग ||5||

मास्क मी लावीन स्वच्छता पाळीन
आनंदी राहून tension टाळींन
कोमट पाण्याच्या गुळण्या मी करीन
Immunity वाढवण्याचा प्रयत्न करीन
योगा आणि मेडिटेशन नियमित करीन||6||

तूच जननी जीवन दायिनी
माय भवानी शोभे व्याघ्रवरूनी
भक्तांच्या रक्षणासाठी लगबग ये ग
वैश्विक महामारी चा विळखा सोडव ग ||7||

हे अंबे पृथ्वीवर धावुनी ये ग

https://youtu.be/kx9sKRUqjac

Comments

  1. Very nice spiritual prayer.We need to pray for the relief of mankind from this pandemic today.May God listens to our prayers.God bless you.

    ReplyDelete
  2. Very nice spiritual prayer.We need to pray for the relief of mankind from this pandemic today.May God listens to our prayers.God bless you.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर