swara , पांडुरंगा गाव तुझं माहित नाही रे lyrics
जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे,
पांडुरंगा गाव तुझं माहित नाही रे
मला वाटते माझा तू रे, पत्र लिहावे
माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे
कैसे तुझं आळवू ,पत्र कोठे पाठवू
पत्ता तुझा माहीत नाही रे
पांडुरंगा ।।1।।
श्रुती सांगती देव आहे, गीता भागवतात
तसाच माझा देव आहे पंढरपुरात
भावाचा तो कागद, भक्तीची ती लेखणी
मनाचा तो टप्पेखाना,टप्पेखाना
बुद्धी चा तो पोस्टमन, त्याचे हाती पत्र धाडीते
पांडुरंगा ।।2।।
संत मंडळी पत्र धाडीती पंढरपुराला
पत्र वाचूनी आनंद, झाला पांडुरंगाला
साष्टांग नमस्कार देवा तुझ्या चरणाला
तसाच माझा नमस्कार तुझ्या कुटुंबाला
एवढे पत्र वाचून घ्यावे
त्याचे उत्तर लवकर द्यावे
माझ्या देवराया रे
पांडुरंगा भक्त लागे पाया रे।।3।।
जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला
पत्ता तुझा ठाऊक झाला रे
पांडुरंगा ठाव तुझा माहीत झाला रे
Comments
Post a Comment