रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात,अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात,stay home stay safe

रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात
अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात

संसाराचा हा व्याप
लक्ष लागेना कामात
दर्शनाची आस मोठी लागली मनास  1

हा कोरोनाचा त्रास
व्यापून असे विश्वास
मायमाऊली मानवास या
दे ग आशीष 2

आर्थिक संकट हे फार
असे अन्नाचा दुष्काळ
अभय देऊन जगतास
या कर भयमुक्त 3

आई आम्ही ग चुकलो
निसर्गास विसरलो
प्राणी, पाणी, हवा यांची
महती ग विसरलो 4

माते घे चुका पोटात
एक वेळ दे संधी पामरास
नियम पाळून आरोग्य राखून
सुधारीन  हे मी जीवन 5

स्वर रचना व गायन
डॉ सौ अनघा कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा lyrics, स्वरा भजनी मंडळ,विठ्ठल भजन

जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना lyrics

सासू सून भांडणे होऊ नयेत यासाठी काय करावे