आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर
पांडुरंगाच्या वारीला पालखी सजली
पालखी सजली , माऊली रथात निघाली
पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण
श्री क्षेत्र आळंदी हुन झाले माऊलीचे आगमन
मुखी विठुचा गजर सारी वैष्णव आनंदली।।1।।
पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण
श्री क्षेत्र देहू हुन झाले तुकोबा चे आगमन
ज्ञानोबा तुकाराम भजनाने
सारी पंढरी दुमदुमली।।2।।
पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण
श्री क्षेत्र हुन नाशिक हुन माऊली गुरू निवृत्ती नाथ
पंढरीच्या दर्शनाला नाथ पंथी निघाले।।3।।
पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण
मुक्ताई पालखी आली लांब गावाहून
चांगदेव शिष्य झाला
गुरू भगिनी माऊली।।4।।
पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण
श्री क्षेत्र हुन सासवड हुन माऊली बंधू सोपान
धन्य धन्य ही पंढरी
ब्रह्मनंदी टाळी झाली।।5।।
स्वर रचना व गायन
डॉ सौ अनघा कुलकर्णी
Comments
Post a Comment