आयुष वनस्पती, medicinal herbs, covid19
सुंठ म्हणजे वाळलेले आले
कफ, वायूच्या सर्व विकारात तसेच हृदय विकाराच्या रुग्णांसाठी सुंठ उपयोगी आहे.
सुंठ पाचक, रोचक, किंचित चवीला तिखट असून लघु, स्निग्ध, उष्ण आहे.
पचल्यावर तिचा मधुर रस होतो
औषधी उपयोग
खालील लक्षणात सुंठ उपयुक्त आहे
पचनाच्या तक्रारी--
भूक न लागणे,अग्निमांद्य, अजीर्ण, उलटी, मळमळ, पोट जड होणे, जेवणा नंतर पोटात दुखणे, आम्लपित्त,आव पडणे, पोट दुखून संडासला होणे,कृमी, पोटदुखी, मूळव्याध,
श्वसनाच्या तक्रारी
सर्दी, खोकला, दमा, ताप, छाती भरणे, दम भरणे, जुनाट खोकला,
नाक चोंदणे, डोकेदुखी, सायनस, अर्धशिशी, कफ पातळ होतो
सांधेदुखी, आमवात, सूज, कंबर दुखी, पाठ दुखी, वेदनाशामक
स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी, अनियमित मासिक स्त्राव, पोट दुखी व कंबर दुखी,
लघवीच्या तक्रारी
सुंठ उष्ण असल्याने अतिप्रमाणात घेऊ नये
गर्भिणी, high ब्लडप्रेशर, अल्सर etc
सुंठी मध्ये
कार्बोहायड्रेट, dietary fiber, fat,protein, vitamin B complex, vitamin C, vitamin E, असून
त्यात calcium, iron, magnesium, manganese, phosphorus, potassium, sodium, zinc आहे
2 दालचिनी
दालचिनी चवीला तिखट गोड असते, ती उष्ण दीपन, पाचक, कफनाशक,स्तंभक,मूत्रल गुणधर्माची आहे
पचनाचे विकार
अपचन, पोटदुखी, छातीत जळजळ, पोट गॅस धरणे,मळमळ, उलटी, जुलाब
सर्दी खोकला, श्वसनाचे विकार यात उपयोगी
हृदय विकारात गुणकारी, रक्त पुरवठा सुरळीत होतो
शरीरात रक्तातील साखर नियंत्रण ठेवते, इन्सुलिन नियंत्रण करते, वजन आटोक्यात ठेवते
स्त्री रोग
गर्भाशय व विकार, PCOS मध्ये उपयोग
वेदनाशामक असल्याने डोकेदुखी अंगदुखी कमी करते
दालचिनी व मध एकत्र खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तवाहिन्या तील cholesterol कमी करते, वजन आटोक्यात ठेवते, सांधेदुखी कमी करते, सर्दी खोकला, घसा खवखवणे, छातीतील कफ कमी होतो, अपचन, गॅस, ऍसिडिटी, जुलाब, अल्सर कमी होण्यास मदत होते,
डोकेदुखी, सायनस, अर्धशिशी यात उपयोग होतो,दातांच्या तक्रारी, तोंडाच्या तक्रारी कमी होतात
दालचिनी उष्ण असल्याने अति सेवनाने पित्त वाढू शकते
दालचिनी मध्ये प्रथिने(proteins),oil (स्निग्ध पदार्थ),कार्बोहायड्रेट, असून त्यात phosphorus, sodium, potassium, thayamin, riboflavin, niacin, vitamin A व C आहेत
Comments
Post a Comment