पंढरीची वारी,विठ्ठल पायी दिंडी, आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर

मुक्काम 
पंढरीची वारी,विठ्ठल पायी दिंडी, 
आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर

पहिल्या मुक्कामी आळंदी सोडली
पर्वतीची मिठी चरणा पडली ॥
      
     दुसऱ्या मुक्कामी शनिवार वाडा
       प्रदक्षिणा घाली पुण्यवान घोडा ॥

तिसरी चढण सासवड घाट
पुसू या मुक्तीची सोपानास वाट॥

     चवथा दिवस जेजूरी गडाला
     हळद लाऊया खंडोबा रायाला ॥

पाचव्या दिवशी वाल्हा मुक्कामाला
कथाकीर्तनात रात काढायला ॥
 
      सहाव्या दिवशी नीरा प्रवाहात
       पांडुरंगासवे रखुमाई न्हात ॥

सातव्या दिसाचा जीवास आनंद
पंढरीच झालं अवघं लोणंद ॥

      तरडगावाची आठवी पायरी
      माऊली थांबते दत्ताच्या मंदीरी ॥

नऊ पावलात येई फलटण
लीन झाला राजा घाली लोटांगण ॥

       दहाव्या वस्तीचे बिडणी बरड
       जीवा वेडावते नाथांचं भारुड ॥

विसावा घ्यायचा नंदाच्या ओढ्याला
चव अमृताची  दह्याधपाट्यला ॥

     अकराव्या रोजी नातेपुते गाठा
      गूळ द्या राहीला विठ्ठल जा हाटा ॥

सदाशीव नामे बारावी नगरी
घोड्याचे रिंगण विठ्ठल गजरी ॥
     
      तेरावा मुक्काम माळशिरसचा
       शेजी अकलूज थांबा तुकयाचा ॥

चवदावे दूर नाही वेळापूर
गोंधळ भक्तीचा सूर्यास्तानंतर ॥
 
     तोंडले बोंडले पंधराव्या दिशी
     भंडी शेगावची होत जाय काशी ॥

सोळावी वाखरी पालख्यांचा मेळ
भक्त खेळतात विठ्ठलाचा खेळ ॥

   पंढरपूरात येतसे माऊली
   विठ्ठल रुख्माई खेळती पावली ॥

कोणती माऊली विठ्ठल कोणता
सांगू शके ऐसा कोण गा जाणता ॥

   विठोबा माऊली ज्ञानोबा माऊली
    नाम विर्घळता उरते 'माऊली' ॥

राम कृष्ण हरी 

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर