मधाचे औषधी उपयोग

सध्या निरनिराळ्या  आजारांचे संक्रमण हे संपूर्ण जगभरामध्ये होत असल्याचे आढळून येते . कोणत्याही आजारांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवणे खूप आवश्यक असते. रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आपल्या नैसर्गिक शारीरिक संरचने सोबतच आपला आहार आणि राहणीमानाचा सुद्धा खूप मोठा प्रभाव पडत असतो. सध्याच्या काळामध्ये प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जातात ज्यांना फारसे पोषक मानले जात नाही. मात्र या दृष्टीने सध्या सर्वत्र जागरुकता निर्माण झालेली आहे

.1) मध हे मधमाश्यांकडून बनवलेला गेलेला गोड, घट्ट असा द्रवपदार्थ असतो. मधामध्ये अनेक पोषक घटक समाविष्ट असतात. एक टेबलस्पून मधाच्या सेवनाने म्हणजेच 21 ग्राम इतक्या मधाच्या सेवनाने आपल्या शरीरामध्ये 63 कॅलरी आणि 17 इतकी साखर जाते. मधामध्ये  फँटस आणि प्रथिनांचे प्रमाण हे नगण्य असते. मात्र फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज या निरनिराळ्या शर्करा मात्र अगदी भरभरून प्रमाणात मधामध्ये असतात. प्रक्रिया केलेल्या साखरेऐवजी मधा मधून शर्करेचे सेवन करणे हे आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर असते. मधाच्या सेवनामुळे शरीराला निरनिराळ्या प्रकारची जीवनसत्त्वे आणि क्षार सुद्धा पुरवले जातात.
2) मधामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या एंटीऑक्सीडेंट समावेश असतो. एंटीऑक्सीडेंट मुळे हृदयविकाराचा झटका येणे, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर आणि डोळ्यांचे आरोग्य राखणे यांसाठी साहाय्य मिळते. फ्लेविनाँल सारख्या एंटीऑक्सीडेंट मुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया  सुरळीत होण्यासाठी मदत मिळते.

3) मधाचे सेवन हे टाईप टू च्या मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायद्याचे आहे असे काही संशोधनांमध्ये आढळून आले आहे. टाईप टू प्रकारचा मधुमेह असलेल्या व्यक्‍तींमध्ये उद्भवू शकणाऱ्या संभाव्य ह्रदय विकाराशी निगडित आजारांचा धोका टळू शकतो. मधाच्या सेवनामुळे टाईप टू मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे नियंत्रित राखले जाऊ शकते. मधाच्या सेवनामुळे शरीरातील बँड कोलेस्टेरॉल अर्थातच एलडीएलचे प्रमाण कमी होते तसेच ट्रायग्लिसराईडचे प्रमाण मधाच्या सेवनामुळे कमी होते.छातीत होणारी जळजळ मधाच्या नियमित सेवनामुळे कमी होऊ शकते. शरीरातील गुड कोलेस्टेरॉल अर्थात एचडीएल चे प्रमाण मधाचे सेवन केल्यामुळे वाढते.
4) सतत तणावाखाली राहणाऱ्या, उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींमध्ये ह्रदय विकार बळावण्याची शक्यता जास्त असते. यामुळे रक्तदाबाचे प्रमाण हे कमी असणे आवश्यक आहे. मधा मधील एंटीऑक्सीडेंट मुळे रक्तदाबाचे प्रमाण हे नियंत्रणात राखता येणे शक्य आहे व परिणामी रक्तदाबाचा त्रास कमी होऊन हृदयविकाराच्या समस्यांवरही मात करता येते.
5) प्राचीन काळापासून भाजल्यावर किंवा जखमांवर मध लावण्याचे उपचार करण्याची पद्धत अस्तित्वात आहे. मधामध्ये असलेल्या एंटीबँक्टिरियल आणि एंटिइनफ्लेमेटरी तत्त्वांमुळे जखम भरून येण्या सोबतच जखमेमुळे त्वचेला होणारा संसर्ग सुद्धा रोखता येतो. जखमेवर होणारी जळजळ व दाह सुद्धा मध लावण्यामुळे कमी होतो. सोरायसिस सारख्या त्वचेच्या आजारावरसुद्धा मध प्रभावी ठरत असे दिसते. मध हा विशेषतःभाजलेल्या जखमांवर खूप उपायकारक आहे.
6) कफ ही लहान मुलांमध्ये आढळून येणारे सर्वसाधारण समस्या आहे. कफ झाल्यावर खोकल्याची उबळ येणे,झोप मोड होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. मध हा अगदी फार पूर्वीपासून कफवरती उपाय करणारा एक घरगुती पर्याय मानला जातो.
7) अगदी प्राचीन काळापासून मध खाण्यासाठी आणि औषधी उपयोगासाठी सुद्धा वापरला जातो.पचनाशी निगडीत विकारांवर सुद्धा  मध हा एक गुणकारी मध आहे. डायरीयासारख्या समस्यांवर मध खाल्ल्यामुळे आराम मिळतो.
8) मधाचे सौंदर्य व त्वचेच्या समस्यांशी निगडित अनेक उपयोग आहेत. मध, बेसन आणि दूध यांचा लेप चेहऱ्याला नियमितपणे लावला तर तारुण्यपीटिका, पुरळ अँलर्जी यांपासून बचाव होतो.

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर